Friday, July 12, 2024
Homeसाहित्य/सामाजिकमहाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हा वतीने निषेध मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातारा जिल्हा वतीने निषेध मोर्चा

सातारा हेमंत पाटील

सातारा – पी. एफ.आय. या संघटनेने मोर्चा काढून पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात आला.

याबाबत प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात, “महाराष्ट्रातील पुणे येथे पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा दिल्या असून शासनाने याचा सखोल तपास करून संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तसेच याच्या मागे असणारा सुत्रदार यांचा तपास करावा.महाराष्ट्रामध्ये हिंदु-मुस्लिम एकत्र राहत असून त्यांच्या दंगली घडविण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्याच्या वर शासनाने कारवाई करावी. पी. एफ. आय. या संघटनेने मोर्चा काढून पुणे येथे “पाकिस्तान जिंदाबाद” या घोषणा दिल्या प्रकरणी सदर संघटनेवर बंदी आणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.या घटनेच्या निषेधार्थ माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला.

दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.यावेळी उपजिल्हाध्यक्ष सचिन पवार,माण तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे,विठ्ठल जाधव,नानासो कट्टे,अक्षय तुपे,धनराज जाधव,सागर कट्टे,धीरज कट्टे,दत्ता बागल, हरिभाऊ जाधव,शुभम खंडे, सूरज कदम,सुरज पवार,शुभम रणपिसे,निखिल जाधव,हिमांशू खरात,सोमनाथ रणपिसे,विश्वराज कट्टे,वरुण गोसावी आशुतोष कट्टे,शुभम कट्टे,व कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!