Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्यामहाभुमी पोर्टल वरुन एका दिवसात दोन लक्ष नागरिकांनी सातबारा ,व इतर कागदपत्रे...

महाभुमी पोर्टल वरुन एका दिवसात दोन लक्ष नागरिकांनी सातबारा ,व इतर कागदपत्रे डाऊनलोड केल्याने शासनाला एका दिवसात३६ लक्ष ६१ हजार रुपयांचा महसूल

या पोर्टल वरून ४कोटी ३७ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , १ कोटी ३७ लक्ष , ८अ , १३ लक्ष ५८ हजार, फेरफार व ८ लक्ष १६ हजार डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले असून त्यातून शासनाला ११२ कोटी ६१ लक्ष रुपये महासूल मिळाला आहे.

पुणे. – पुणे
महसूल विभागाच्या महाभूमी पोर्टल वरून दिनांक ६जुलै रोजी एका दिवसात १,४८,७२६ डिजिटल स्वाक्षरीत सातबारा, ५५,७३२ डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारे, ४४८८ डिजिटल स्वाक्षरीत फेरफार आणि ६४८२ डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले असून एका दिवसात दोन लक्ष नागरिकांनी लाभ घेतला असून ३६ लक्ष ६१ हजार रुपयांचा महसूल नक्कल फी मधून शासनाला मिळण्याचा हा आज पर्यंतचा उच्चांक झाला आहे.


महाभूमी पोर्टल सुरु झाल्या पासून या पोर्टल वरून ४कोटी ३७ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ , १ कोटी ३७ लक्ष डिजिटल स्वाक्षरीत ८अ , १३ लक्ष ५८ हजार डिजिटल स्वाक्षरीत फेरफार व ८ लक्ष १६ हजार डिजिटल स्वाक्षरीत मिळकत पत्रिका (property card) डाऊनलोड करण्यात आले आहेत. त्यातून शासनाला ११२ कोटी ६१ लक्ष रुपये महसूल मिळाला आहे.
सध्या महसूल विभागाच्या या डिजिटल सुविधेचा वापर वाढत असून शेतकरी वर्ग देखील याचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याने नकला मिळण्यासाठी तलाठी किंवा अन्य अधिकारी यांचेवरील अवलंबित्व कमी झाले आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!