Saturday, May 25, 2024
Homeताज्या बातम्यामहापुरुषांबद्दल वेताल वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कार्यवाही करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे सर्वपक्षीय...

महापुरुषांबद्दल वेताल वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कार्यवाही करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे सर्वपक्षीय मोर्चा

प्रतिनिधी मयूर भुजबळ

तळेगाव ढमढेरे – तळेगाव ढमढेरे येथे महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व पक्षीय व ग्रामस्थ यांच्या वतीने तळेगाव ढमढेरे निषेध पायी रॅली व निषेध सभा घेण्यात आली .त्यानंतर उपस्थित जनसमुदायाच्या वतीने पोलीस प्रशासनास पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या राज्यात पदाधिकारी व राजकीय नेते यांसकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिरत्न महात्मा फुले,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेस वाहून घेतले अशा महापुरुषांबद्दल महाराष्ट्रातील मंत्री,राजकीय नेते यांसकडून वारंवार अपमानस्पद बेताल वक्तव्य केले जात आहे .अशा बेजबाबदार व्यक्तींवर कडक कार्यवाही करण्यात यावी असे या निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके,आर .पी.आय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वनाथ अवचिते ,आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे,सोमनाथ कुदळे ,अविनाश शेलार ,संतोष शेलार यांनी भावना व या महापुरुषांची कार्य याची माहिती दिली.निषेध सभा प्रसंगी ग्रा.सदस्य मनोज आल्हाट ,महेश भुजबळ ,माउली आल्हाट,महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा आल्हाट ,संचालक अशोक शेलार,सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब आल्हाट ,हनुमंत आल्हाट, सचिन शेलार,मयुर आल्हाट,सुदर्शन तोडकर ,जितेंद्र जेधे ,सागर ढाले,रुपेश शेलार,सागर कांबळे,रमेश शेलार,अरविंद आल्हाट,धनंजय आल्हाट,राकेश शेलार,बंटी शेलार,प्रकाश शेलार ,कार्तिक कुंभकर्ण,रजनीकांत ओव्हाळ अमोल आल्हाट,संदेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.निषेध सभेचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ),सिद्धार्थ विकास मंडळ व जय मल्हार मंडळ यांच्या सयुंक्त विद्यमानाने करण्यात आले होते.शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी,रणजीत पठारे,पोलीस हवालदार किशोर तेलंग,अमोल चव्हाण ,अशोक केदार यांच्या वतीने उत्तम सुव्यवस्था राखण्यात आली .

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!