Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यामहापुरुषांच्या अवमानकारक वक्त्यव्यांविरोधात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दांडेकर पूल येथे 'जोडे...

महापुरुषांच्या अवमानकारक वक्त्यव्यांविरोधात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दांडेकर पूल येथे ‘जोडे मारो’आंदोलन

पुणे – मंत्री चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी क्रांतीज्योती महात्मा फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांच्या झालेल्या अपमाना विरुद्ध द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोशिएशन च्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे यांच्या नेतृत्वा खाली मंत्री चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या प्रतिमेस जोडे मारून दांडेकर पूल येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाची जाज्वल्य परंपरा विसरत महापुरुषांचा अपमान करणाऱ्या मंत्री मंत्री चंद्रकांत पाटील व राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचा जोडे मारत निषेध व्यक्त केला.

या प्रसंगी ॲड दिपक गायकवाड,भाऊ गदादे , नगरसेविका प्रिया गदादे ,राष्ट्रवादीचे महेश शिंदे अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड ,गणेश पालके ,गणेश गाडे, किशोर शिंदे भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!