Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रमराठा मोर्चाच्या क्लिपची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

मराठा मोर्चाच्या क्लिपची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदासह सर्व संविधानिक पदाचा राजीनामा द्यावा – सतीश काळे

पुणे – समाज माध्यमांवर मराठा आरक्षण शमविण्यासाठी मराठा मोर्चाच्या स्वयंघोषित समन्वयकांची एक ऑडिओ क्लिप प्रसारित झाली आहे. या क्लिपमध्ये मराठा आरक्षण शमिवण्यासाठी आंदोलनात फूट पाडण्याच्या हेतूने तत्कालीन सत्ताधारी नेत्यांनी पैशाची देवाणघेवाण केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे या मधील संबंधित आत्ताचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना पैशाचे आमिष दाखवून मराठा आरक्षण संदर्भांत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या काही स्वयंघोषित समन्वयकां बरोबर प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे सदर ऑडिओ क्लिप च्या संभाषणा वरुन स्पष्ट होतं आहे.

सदरील आंदोलनांच्या काळात जवळपास ४२ मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या होत्या त्यामुळे या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन याची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करुन त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप मध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्या सर्वांची ‘लाई डिटेक्टर टेस्ट’ ( Lie Ditector Test ) करण्यात यावी. तसेच या प्रकरणातील सर्व व्यक्तींची २०१६ पासून ते आतापर्यंतच्या सर्व पैसे देणारे व पैसे घेणारे याचे आर्थिक व्यवहार तपासून त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी. तो पर्यंत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्रीपदासह सर्व संविधानिक पदाचा राजीनामा घेण्यात यावा.

सदर ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांध्ये व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजातील तरुणांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली असून त्यांच्यामध्ये आपली फसवणूक झाल्याची भावना तयार झाली आहे. तसेच मराठा समाजात यामुळे प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्रात जो काही उद्रेक होईल याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल अशा इशाऱ्याचे निवेदन राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,पुणे जिल्हाधिकारी,पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड तसेच आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे निवेदन ईमेल द्वारे संभाजी ब्रिगेडचे शहर अध्यक्ष सतीश काळे य

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!