Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्यामनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शिरूर हवेली तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर

मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शिरूर हवेली तालुक्यात ठिकठिकाणी बॅनर

कोरेगाव भिमा – मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil)यांनी मोर्चा काढला असून यामध्ये मोठ्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहेत. यावेळी  मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे शिरूर तालुक्यात जंगी स्वागत होणार असून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.यामध्ये नागरिकांसह आमदार अशोक पवार स्वागताचे बॅनर लागले आहेत.(Maratha reservation)

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून निघालेला मोर्चा  बीड, नगर जिल्ह्यातून मुंबईला जाणारा हा मोर्चा पुणेमार्गे जाणार आहे. मंगळवारी (ता.23 जानेवारी) हा मोर्चा रांजणगाव, शिक्रापूर, येथून कोरेगाव भिमा ,वाघोली असा पुढे जाणार आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आमदार अशोक पवार यांच्या फोटोसह बॅनर झळकले आहे.(मराठा आरक्षण) 

मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होत विविध सुविधा व सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!