Wednesday, October 9, 2024
Homeताज्या बातम्यामध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल...

मध्यरात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे काल पुण्यात निधन झाल्याने अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार.

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा पुण्यात दाखल झाले आहेत. याबरोबरच सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे जे.पि. नड्डा ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अंत्यदर्शनाला उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट वर श्रधनाजली अर्पण करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक श्री मदनदास देवी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. मदनदास देवी यांच्या निधनाने संघटनेची न भरून येणारी हानी झाली आहे.निस्वार्थ भावनेने त्यांनी राष्ट्रसेवा व संघ कार्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं. असे भावपूर्ण ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या ट्विटर वरून ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखदायक आहे. बालपणापासून आपलं जीवन राष्ट्रसेवेसाठी तसेच संघ कार्यासाठी समर्पित केले होते.त्यांच्या निधनाने संघ परिवाराचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. परमेश्वर मदनदास देवी यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच संघ परिवारातील समस्त सदस्यांना या दुःखातून सावरण्याकरता बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.” भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!