Thursday, June 20, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रमंत्री शंभूराज देसाई यांचे उंब्रजमध्ये पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत

मंत्री शंभूराज देसाई यांचे उंब्रजमध्ये पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत

श्री शिव योद्धा प्रतिष्ठान व शिवप्रेमीकडून यांच्यावतीने मानाचा फेटा बांधून भव्य स्वागत समारंभ

तासवडे येथेही श्री शिव योध्दा प्रतिष्ठान कडुन स्वागतकुलदीप मोहिते कराडदिनांक १४ ऑगस्टआमदार शंभूराजे देसाई यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबीनेट मंत्री पदी निवड झाली यानंतर प्रथम ते सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना साताऱ्यातील विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे.

उंब्रज व तासवडे (ता.कराड ) येथे श्री.शिव योद्धा प्रतिष्ठान व शिवप्रेमींच्यावतीने जे.सी .बी मशिनच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत करण्यात आले. उंब्रजमध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची १६ फूट उंच पंचधातूची अश्वारूढ मूर्ती उभारणीचे काम चालू असून या शिवकार्यासाठी आमदार देसाई यांचे महत्वाचे सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन केले आहे.याचे औचित्य साधून श्री शिव योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने शंभूराज देसाईंना मानाचा फेटा घालून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन उंब्रज व तासवडे येथे स्वागत करण्यात आले. यावेळी श्री शिव योद्धा प्रतिष्ठान शिवस्मारक समितीचे सर्व कार्यकर्ते हजर होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!