Thursday, June 20, 2024
Homeक्राइमभीषण अपघात...कोरेगाव भीमा येथे थार गाडीने वृद्धेला जोरदार धडक देत  ५० फूट ...

भीषण अपघात…कोरेगाव भीमा येथे थार गाडीने वृद्धेला जोरदार धडक देत  ५० फूट  फरफटत नेल्याने शरीराचे दोन भाग झाल्याने जागीच  मृत्यू

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे वढू रस्त्याच्या बाजूने शतपावली करणाऱ्या वृध्द महिलेला भरधाव येणाऱ्या थार गाडीने जोरदार धडक दिल्याने वृद्ध महिलेच्या शरीराचे दोन भाग होऊन दोन्ही भाग लांबवर पडल्याने जागीच मृत्यू झाला असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रक्त होते.

  याबाबत ग्राम पंचायत सदस्य केशव फडतरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून मिळालेल्या माहितीनुसार जेवणानंतर रात्री ९.४५ वाजता.  शतपावली करणाऱ्या  केशरबाई अशोक निकम (वय ६४) या वृद्ध महिलेला वढू बुद्रुक बाजूकडून कोरेगाव भिमाकडे येणाऱ्या भरधाव थार गाडीने केशरबाई यांना जोरदार धडक देत जवळपास ५० फुट फरफटत नेल्यामुळे त्यांचे शरीराचे कमरेपासुन दोन तुकडे झाले व त्या जागीच मयत झाल्या. अपघात झाल्यावर थार चालक अपघातस्थळी न थांबता फरार झाला.

 शिक्रापूर पोलिसांनी सदर गाडी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!