Monday, June 17, 2024
Homeक्राइमभीषण अपघातात नववधूसह सासरा मृत्युमुखी... तिघांचा जागीच मृत्यू.... पतीही गंभीर जखमी

भीषण अपघातात नववधूसह सासरा मृत्युमुखी… तिघांचा जागीच मृत्यू…. पतीही गंभीर जखमी

दौंड – स्वामी चिंचोली (ता. दौंड) हद्दीतील दत्तकला महाविद्यालयाजवळ मंगळवारी (दि. १३ फेब्रुवारी ) सकाळी साडेदहाच्या सुमारास  सेलेरो कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये नववधूसह सासरा व आणखी एकजण मृत्युमुखी पडल्याने  तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

      मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये बुबासाहेब दत्तात्रय धेंडे (वय ४८, रा. जोतीबाचीवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), राजू बबरुवान मस्के (वय ५२, रा. अजिंठानगर, पिंपरी चिंचवड) आणि नववधू राधा अजय मस्के (वय २२, रा. अजिंठा नगर पिंपरी चिंचवड ) यांचा समावेश आहे. राधा व अजय यांचा मागील महिन्यातच विवाह झाला होता.

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कामानिमित्त स्थायिक असणारे मस्के कुटुंबीय पुण्यावरून सोलापूरला आजारी आजीला भेटण्यासाठी सेलेरो (एमएच १२ एलजे ६०५४) या कारमधून निघाले होते. त्यांची कार स्वामी चिंचोली गावच्या हद्दीतील दत्तकला महाविद्यालयाजवळ आली असता सोलापूरकडे निघालेल्या मालवाहू ट्रक (एमएच ०९ सीए ३६६२)ला पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात बुवासाहेब दत्तात्रय धेंडे, राजू बबरुवान मस्के आणि राधा अजय मस्के यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये राजू मस्के हे राधा मस्के यांचे सासरे आहेत. या दुर्घनेत नववधू राधा मस्के हिचा पती अजय राजू मस्के (वय २६) आणि काजल राजू मस्के (वय २३, दोघेही रा. अजिंठानगर, पिंपरी चिंचवड) हे गंभीर जखमी झाले आहेत.

    अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आपुलकीची सेवा या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवले. या घटनेचा तपास दौंड पोलिस करीत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!