Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याभीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात असताना पत्रकार सचिन तोडकर यांच्या चारचाकी गाडीने ...

भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी जात असताना पत्रकार सचिन तोडकर यांच्या चारचाकी गाडीने घेतला अचानक पेट

येथे भाऊ हनुमंत तोडकर यांच्या प्रसंगावधानामुळे कुटुंबीयांचे वाचले प्राण

मंचार – मंचर येथील पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंबीय भीमाशंकर येथे बुधवार (दि ३१ मे ) रोजी देव दर्शनासाठी जात असताना पोखरी गावच्या हद्दीत चारचाकी कारने बुधवार दुपारी अचानक पेट घेतला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.पत्रकार तोडकर यांचे बंधू हनुमंत तोडकर हे पाठीमागे दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांनी पत्रकार तोडकर यांना गाडी पेटल्याची तत्काळ फोनद्वारे माहिती दिली. त्यामुळे पत्रकार तोडकर यांनी तात्काळ गाडी थांबवून ते कुटुंबियासह गाडीच्या बाहेर उतरले आणि त्यानंतर गाडी आगीच्या ज्वाळात सापडली.

बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भीमाशंकर येथे देवदर्शनासाठी घरातीलच दोन गाड्यांमध्ये सचिन तोडकर आणि त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर भीमाशंकर या ठिकाणी दोन वेगवेगळ्या चारचाकी कारने निघाले होते.सचिन तोडकर त्यांच्या डस्टर गाडी क्रं एम एच ४३ ए एन ६९८६ गाडी होती. तर भावाकडे दुसरी चारचाकी गाडी होती. हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणावर फिरुन ते भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले असता पोखरी गावच्या हद्दीत दुपारी ३.३० च्या दरम्यान सचिन तोडकर यांच्या गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूतून अचानक धूर व जाळ निघू लागला.पत्रकार सचिन तोडकर हे स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांच्या हि बाब लक्षात आली नाही. मात्र त्यांच्याच गाडीच्या पाठीमागे असलेला त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर यांना गाडीच्या पुढच्या व मागच्या बाजुने जाळ व धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत फोन करुन सचिन तोडकर यांना माहिती दिली. त्यानंतर सचिन तोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी रत्यावर थांबवली. तसेच गाडीत असलेली त्यांची पत्नी, मुलगा, भाचा, दोन लहान मुली यांना गाडीच्या बाहेर काढले.

यातोपर्यंत गाडीतील पुढील भागाला आग लागली होती.त्यानंतर गाडीतील थंड पाण्याने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता ती वीझली नाही. मग तेथूनच जवळ असलेल्या हॉटेल ज्ञानेश्वर चे मालक नारायण सोळसे यांनी पाण्याचा टँकर आणून आग विझवली. या आगीत गाडीचा काहीभाग पूर्णपणे जळाला असून मोठें नुकसान झाले आहे. दरम्यान गाडीच्या मागे असलेले हनुमंत तोडकर यांनी फोन केल्याने मोठी दुर्घटना टळली तसेच दैव बलवत्तर म्हणून आमचे कुटुंब वाचले अशी प्रतिक्रिया पत्रकार सचिन तोडकर यांनी दिली. तसेच गाडी पेटल्यानंतर आग विझविण्यासाठी सोळसे बंधू यांनी खूप मोलाची मदत केली याबाबत त्यांनी सोळसे बंधूचे आभार मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!