Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याभारत रचणार इतिहास ..इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या उड्डाणाला आता काही तास शिल्लक

भारत रचणार इतिहास ..इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या उड्डाणाला आता काही तास शिल्लक

Chandrayaan-3 Launch Live Streaming: इस्रोच्या चांद्रयान ३ मोहिमेच्या उड्डाणाला आता काही तास शिल्लक आहे. या मोहिमेचे लाइव्ह अपडेट तुम्ही कधी, कुठे आणि केव्हा पाहू शकाल ते याबाबत माहिती घ्या…

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) पुन्हा एका चांद्र मोहिमेसाठी सज्ज आहे. चंद्रयान-3 ही भारताची आजवरची सर्वांत किचकट आणि सर्वांत महत्त्वाची अंतराळ मोहीम मानली जात आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने नेहमीच देशाची मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. मंगळ यान असो किंवा अन्य अनेक मोहिमा इस्रोने नेहमीच अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आता भारताची महत्वाकांक्षी चांद्रयान ३ ही सुरु होण्यासाठी फक्त काही तासाचा कालावधी शिल्लक आहे.
14 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी मार्क ३च्या साहाय्याने चांद्रयान 3 चे प्रक्षेपण केले जाईल. त्यानंतर 23 किंवा 24ऑगस्ट रोजी किंवा सप्टेंबरच्या अखेरीस यानापासून विलग झालेले ‘लँडर’ चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल.
चांद्रयान 3 चे लाइव्ह प्रक्षेपण तुम्ही एक दोन नव्हे तर चार ठिकाणी पाहू शकता. सर्वात पहिले ठिकाण म्हणजे इस्रोची वेबसाइट होय. इस्रोच्या http://isro.gov.in या वेबसाइटवर तुम्ही लाइव्ह प्रक्षेपण पाहू शकता. त्याच बरोबर इस्रोच्या फेसबुक पेजवर https://facebook.com/ISRO याचे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे. चांद्रयान 3 चे प्रक्षेपण पाहण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे इस्रोचे youtube चॅनल होय. इस्रोच्या https://youtube.com/watch?v=q2ueCg9bvvQ वर प्रक्षेपण पाहता येईल. या शिवाय डीडी नॅशनलवर दुपारी 2 वाजल्यापासून याचे प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.
इस्रोने या मोहिमेची सर्व माहिती सोशल मीडिया आणि वेबसाइटवर दिली आहे. त्याच बरोबर या मोहिमेच्या तयारीचे फोटो देखील तुम्ही इस्रोच्या फेसबुक आणि इस्टाग्राम पेजवर पाहू शकता.

भारताने याआधी चंद्रावर दोन मोहिमा केल्या होत्या. याआधीची म्हणजे चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला विक्रम लँडर चंद्राच्या भूमीवर उतरवण्यात अपयश आले होते. त्यानंतर चांद्रयान 3 च्या मोहिमेला सुरुवात झाली. गेल्या 4 वर्षात 615 कोटी रुपये खर्च करून हे यान आता उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. या मोहिमेत विक्रम लँडर (चांद्र स्थानक), प्रग्यान रोव्हर (स्वयंचलित वाहन) आणि प्रोपल्जन मॉड्यूल (वाहक यंत्रणा) हे 3 महत्त्वाचे भाग आहेत.

चंद्रयान विरुद्ध अपोलो मोहीम
चंद्रयान-3 हे अंतराळयान भारतीय वेळेनुसार 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. चंद्रयान-3 ला आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाहून प्रक्षेपणानंतर चंद्रावर पोहोचायला 40 दिवस लागतील.

तुलना करायची झाल्यास, याआधीची चंद्रयान-2 मोहीम 22 जुलै 2019 रोजी सुरू झाली आणि 6 सप्टेंबर 2019 ला त्याचा विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला. म्हणजे चंद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते.

चंद्रयान-1 ही मोहीम 28 ऑगस्ट 2008 ला सुरू झाली होती आणि त्याचा ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत 12 नोव्हेंबर 2008 रोजी दाखल झाला होता, म्हणजे सुमारे 77 दिवसांनी. म्हणजे प्रत्येक नवीन चांद्र मोहिमेत इस्रोला हे दिवस कमी करता आले आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!