Monday, October 14, 2024
Homeइतरभारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार सुनिल बाबर झाल्याबद्दल साई मेडिकल फाउंडेशन...

भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार सुनिल बाबर झाल्याबद्दल साई मेडिकल फाउंडेशन & चारिटेबल ट्रस्ट उंब्रज कराड वतीने सत्कार

प्रतिनिधी हेमंत पाटील कराड

आनंदपूर -दिनांक २८ फेब्रुवारी

उंब्रज (ता.कराड) साई मेडिकल फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असते यावेळी ग्रामीण भागातून आलेल्या सुनिल एकनाथ बाबर यांची भारतीय सैन्य दलामध्ये सुभेदार म्हणून पदोन्नती झाले बद्दल त्यांचा सत्कार साई मेडिकल फाऊंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश मोहिते यांच्या वतीने करण्यात आला .या सत्कार सोहळ्यात सुभेदार बाबर यांनी अत्यंत खडतर परिस्थितीतून १९९५ साली भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाल्या पासून २७ वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये आसाम,पंजाब,पुणे,व त्यानंतर त्यांनी कारगील व सध्या उत्तर प्रदेश येथील अनुभव कथन केले. यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मोहिते यांनी भारतीय सीमेवर जवान सतर्क असल्यामुळेच आम्ही भारतीय सुरक्षित आहोत असे मत व्यक्त केले.या सत्कराप्रसंगी , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील पवार शिवाजीनगर (उंब्रज), अशोक भिलारे, सतीश साळुंखे, शिवाजी जाधव व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!