Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रवाघोलीतील भारतीय जैन संघटना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाघोलीतील भारतीय जैन संघटना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाघोली – दिनांक २६ जानेवारी वाघोली ( ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी टेक महिंद्रा कंपनीचे सल्लागार विल्सन डी व राहुल बेदमुथा, चंद्रकांत पगारिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

तसेच याप्रसंगी भारतीय संविधानाचे वाचन करण्यात येऊन एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन व स्कूल मधील विद्यार्थ्यांचे कवायतीचे प्रकार करण्यात आले. यावेळेस प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, महाविद्यालय विकास अध्यक्ष अरुण नहार, अभय फुलपगर व सुरेश साळुंके उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी विल्सन डी यांनी आयटी क्षेत्रातील भारताची कामगिरी तसेच बेदमुथा यांनी भारताची इंटरनेट क्षेत्रात भरारी यासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील बक्षीसे मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला .

कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी मांडले. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात येऊन प्रकल्पातील ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!