Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याभारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विदयालयात इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांचे...

भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विदयालयात इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

यावेळी विद्यालय हे विविध आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

वाघोली : येथील भारतीय जैन संघटना उच्च माध्यमिक विदयालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचे आयोजन दिनांक ३ ऑगस्ट २०२३ गुरुवार रोजी करण्यात आले होते. शैक्षणिक वर्ष २०२३ -२४ साठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थी -विदयार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित होत्या. यावेळी विद्यालय हे विविध आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले. विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापक सुरेश साळुंखे उपस्थित होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य भंडारी सर यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यामध्ये शिस्त स्वच्छता आणि गुणवत्ता महत्त्वाची आहे हे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच व उपप्राचार्य गेठे सर यांनी विद्यार्थ्यांना विद्यालयाची शिस्त महत्त्वाची आहे .याबाबत माहिती दिली.

प्रा. देवडकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दहावीच्या यशाबाबत कौतुक थोडक्या यशाने हुरळून न जाता गर्व न बाळगता अभ्यासात रुची निर्माण केल्यास यश हमखास मिळेल असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आनंदी वातावरणात विद्यार्थ्यांच्या स्वागताचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष कष्ट घेतले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!