Friday, July 12, 2024
Homeताज्या बातम्याभारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त बकोरी वनराई...

भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त बकोरी वनराई येथे वृक्षारोपण

कोरेगाव भिमा – बकोरी (ता.हवेली) येथे भारताच्या राजकारणातील एक ‘अटल’ व्यक्तिमत्व,भारतीय जनसंघ तसेच भारतीय जनता पक्षाचे संस्थापक,भारतमातेची अव्याहतपणे सेवा करणारे, भारतीय नागरिकांचे प्रेरणास्थान,प्रेरणादायी कवी,लेखक,ओजस्वी वक़्ते दिवंगत पंतप्रधान, भारतरत्न ,श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने बकोरी वनराई येथे वृक्षारोपण करण्यात आले.

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे अतुलनीय काम व विचार यांची चिरंतन व प्रेरणादायी स्मृती जपण्यासाठी वृक्षारोपण करत अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली असल्याचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे यांनी सांगितले.

      यावेळी वृक्षारोपणासाठी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष राहुल कुटे, सचिव विलास सातव, माहिती सेवा समिति अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, युवा नेते चेतन राऊत, जितेश पाटिल व इतर पदाधिकारी  मान्यवर उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!