Wednesday, April 24, 2024
Homeकृषिभाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य पदी रोहिदास उंद्रे यांची निवड

भाजपा महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य पदी रोहिदास उंद्रे यांची निवड

पुणे जिल्ह्यात भाजपा कार्यकारिणीची ताकद वाढण्यास मोठी मदत

कोरेगाव भीमा – मांजरी खुर्द ( ता.हवेली) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचितसंचालक रोहिदास उंद्रे यांची
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत बुधवारी नवीन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये उंद्रे यांची निवड करण्यात आल्याने रोहिदास उंद्रे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नुकत्याच झालेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवणुकित भरघोस मतांनी विजय मिळवल्याचा आनंद साजरा होत आहे.याचबरोबर भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला असून मोठा उत्साह व आनंद साजरा होत असून व आनंद साजरा होत असून कार्यकर्ते व नागरिकांनी जोरदार जल्लोष करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मांजरी खुर्द येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील, तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास दामोदर उंद्रे यांची भाजप महाराष्ट्र प्रदेश निमंत्रित सदस्य पदी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवड केली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत बुधवारी नवीन कार्यकारणी जाहीर केली यामध्ये उंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बुधवारी ३ मे रोजी मुंबई येथे नवीन कार्यकारणी जाहीर केली असून आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जम्बो कार्यकारणी तयार करण्यात आली. ही जम्बो कार्यकारणी ची टीम निवडणुकीसाठी सज्ज असणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या नवीन कार्यकारणीच्या माध्यमातून ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०२ अधिक जागा जिंकण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे. या अनुषंगाने पक्षाने या निवडी जाहीर केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतांनी रोहिदास उंद्रे निवडून आले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवत बळीराजाला सुखी करण्यासाठी काम करणार असून. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी गावागावातील युवकांना संघटित करून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच आगामी निवडणुकांत विजयश्री खेचून आणण्यासाठी पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडत विजयश्री खेचून आणण्यासाठी काम करणारा आहे. – रोहिदास उंद्रे, नवनिर्वाचित निमंत्रित सदस्य महाराष्ट्र प्रदेश, भाजपा, नवनिर्वाचित सदस्य हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!