Thursday, June 20, 2024
Homeक्रीडाभाजपा क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष पदी दशरथ वाळके

भाजपा क्रीडा आघाडी हवेली तालुकाध्यक्ष पदी दशरथ वाळके

कोरेगांव भीमा : पेरणे फाटा ( ता.हवेली)

हवेली तालुक्यातील पेरणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ वाळके यांची हवेली तालुका भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी च्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. वाळके यांची क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली आहे. दशरथ वाळके यांना हवेली तालुका भाजपा अध्यक्ष संदीप भोंडवे व भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा महाराष्ट्र सचिव गणेश कुटे यांच्याकडून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

दशरथ वाळके यांनी स्थानिक पातळीवर खेळाडूंची उत्तम रित्या बांधणी करून खेळाडू वर्गात चांगले स्नेहाचे संबंध प्रस्थापित करून अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. हवेली तालुका अध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे यांच्या बरोबर राज करंडक,पी टी पी एल,एम टी पी एल, जाणता राजा करंडक अशा नावाजलेल्या स्पर्धांचे यशस्वी नियोजन देखील केले आहे. वाळके यांचा क्रीडा क्षेत्रा बरोबरच सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय,कला, व आध्यात्मिक क्षेत्रात ही नावलौकिक असून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पायी पालखी सोहळ्याची नियोजनाची यशस्वी धुरा ते सांभाळत असतात.

क्रीडा क्षेत्रात कार्यरत राहून क्रीडा क्षेत्र सक्षम आणि सशक्त करण्यासाठी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आदींना अभिप्रेत असणारी क्रीडा आघाडीची ध्येय- धोरणे,खेळाडूंच्या समस्या व वरिष्ठ क्रीडा आघाडी ने दिलेले कार्यक्रम खेळाडूं च्या शाश्वत विकासासाठी राबवून क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये व ग्रामीण भागातील खेळाडू वर्गाचे स्थान अधोरेखित करण्याची जबाबदारी वाळके यांच्यावर सोपवली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल शिरूर हवेली चे माजी आमदार बाबुराव पाचर्णे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद,पी एम आर डी ए सदस्य स्वप्नील उंद्रे,विद्युत वीज नियंत्रण समिती सदस्य विपुल शितोळे,मूखईचे ग्रामपंचायत सदस्य सचिन पलांडे,भाऊसाहेब शिंदे,सचिन कोतवाल यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच आगामी काळात क्रीडा आघाडी च्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अथक परिश्रम घेऊन केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचन्यासाठी विशेष प्रयत्न करणार

दशरथ वाळके , नवनिर्वाचित हवेली तालुकाध्यक्ष क्रीडा आघाडी भाजपा.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!