आठ दिवसांत सावलीची सोय झाली नाही तर बाजार समितीच्या अधिकार्यांना, कर्मचाऱ्यांना आवारात प्रवेशबंदीचा इशारा
शिरूर – भाजपचे महाराष्ट्र राज्य उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांच्या लेखी निवेदन व पाठपुराव्याला यश आले असून शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच भाजीपाला विक्रीसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली असून यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
शिरूर बाजार समितीच्या आवारात शेतक-यांसाठी भाजीपाला खरेदी व विक्री साठी जागा नसल्याने भर उन्हात रस्त्यावर बसण्याची शेतकऱ्यांवर वेळ यायची,कडाक्याचं यामुळे शेतकरी उन्हाने त्रस्त व्हायचे, शेतलामाचे नुकसान व्हायचे दिवसरात्र घाम गाळून पिकविलेला शेतमाल खराब होण्याची शक्यता असायची तसेच उन्हामध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना साधी पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत होते याबाबत संजय पाचंगे यांनी प्रशासक व सचिव बाजार समिती यांना लेखी निवेदन दिले होते.
त्यानुसार बाजार समितीने आवारात एक पाण्याच्या गाडीसह पिण्याच्या पाण्यासाठी दोन रांजणाद्वारे थंड पाण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली परंतु रांजणाऐवजी पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करुन देण्यास बाजार समितीने मान्य केले. तसेच सावलीसाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या ठिकाणी सावलीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यावेळी बाजार समितीचे प्रशासक साकोरे साहेब, बाजार समितीचे मैड साहेब व इतर कर्मचारी उपस्थित होते.