Friday, June 21, 2024
Homeसाहित्य/सामाजिकचला व्यक्त होऊ या?'भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजित पवार बाहेर पडा, बाहेर पडा

‘भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजित पवार बाहेर पडा, बाहेर पडा

बारामतीत मराठा समाज आक्रमक

पुणे – सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा अशा घोषणांनी बारामतीचा मोर्चा दणाणून गेला होता. मराठा बांधवाकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली असून मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटा येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक मराठा तरुण, महिला जखमी झाले असून याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत.

आजही अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरून जुलमी सरकारचा निषेध करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होमग्राऊंड असणाऱ्या बारामती येथेही मोठ्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवत राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर, आज बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अजित पवारांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली.

बारामतीमध्ये एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती शहरात मोर्चा काढण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्य पोलिसांवर कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही आंदोलकांनी केली आहे. यावेळी, अजित पवारांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणीच या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

जालना येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बारामती येथे मराठा समाजाकडून आज मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी शिंदे, फडणवीस, पवार सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून ‘भरलाय सरकारच्या पापाचा घडा, अजित पवार बाहेर पडा, बाहेर पडा बाहेर पडा; अजित पवार बाहेर पडा’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!