Thursday, June 20, 2024
Homeक्राइमभयंकर! नवऱ्याने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, शांतपणे बसला अंगणातील झाडाखाली

भयंकर! नवऱ्याने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळलं, शांतपणे बसला अंगणातील झाडाखाली

दारूच्या नशेत..पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही होता बडबडत.

अहमदनगर – संशयाने पछाडलेल्या पतीने दारुच्या नशेत पत्नीसह दोन मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना अहमदनर तालुक्यातील वडगाव लांडगा इथं घडली असून नराधम पतीने पत्नीसह दोन मुलींना जाळल्यानंतर घरासमोर असलेल्या अंगणातील झाडाखाली पती निवांत बसला होता.

पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असतानी सोमवारी सकाळी नऊ वाजता पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले. पत्नी लिलाबाई (वय २६ वर्ष), मुलगी साक्षी (वय १४ वर्षे) व खुशी नऊ महिने यांना मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

सोमवारी सकाळी नऊ वाजता अहमदनगर जिल्ह्यासह राज्याला हादरवणाऱ्या घटनेने शोक व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे याने त्याची पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.आरोपी सुनिल लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारुच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!