Thursday, July 25, 2024
Homeताज्या बातम्याभगवंतांची निरपेक्ष भक्ती ही मुक्ती मिळवून देते - बाळकृष्ण वसंतगडकर महाराज

भगवंतांची निरपेक्ष भक्ती ही मुक्ती मिळवून देते – बाळकृष्ण वसंतगडकर महाराज

सणसवाडी येथील श्री भैरवनाथ महाराजांचा अकरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर)
चातक पक्षी पावसाचे पाणी पिऊन आपली तहान भागवतो, तो त्याच निष्ठेने आपण संसारात भगवंतांची भक्ती करायला हवी.माणसे देवाला एक रुपयाचं दान देऊन लाखोंचे मागत असतो ज्याने विश्व निर्माण केले त्याला आपण काय देणार?
परमार्थ इच्छा आणि वासना बाजूला ठेऊन भक्ती करावी.परमार्थ ही नेटका करायला हवा. आपण या पृथ्वीतलावर पाहुणे म्हणून आले आहोत भगवंतांची भक्ती आणि सामाजिक जाणीव व भान जपत आयुष्य जगायला हवे असे प्रबोधन संतचरणरज वसंतगडकर महाराज यांनी करत भगवंत भक्ती व सामाजिक जबाबदारी यांचे मार्गदर्शन केले.

सणसवाडी येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. २३ व २४ फेब्रुवारी या दोन दिवसिय धार्मिक कार्यक्रमात दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची महापूजा ,गणपती पूजन,होमहवन ग्राम पुरोहित महेश सातभाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.सायंकाळी बाळू महाराज गिरगावकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर माजी उपसरपंच शिवाजी दरेकर यांच्यावतीने महाप्रसादाचे अन्नदान करण्यात आले. यावेळी भैरवनाथ भजनी मंडळ व पांडुरंग सेवा भजनी मंडळ यांच्यावतीने भजन सेवा करण्यात आली.

मंदिरांची आकर्षक फुलांची सजावट उपसरपंच दत्तात्रय नामदेव हरगुडे यांच्यावतीने करण्यात आली होती.

दुसऱ्या दिवशी दिनांक २४ फेब्रुवारी श्रींचा अभिषेकानंतर भैरवनाथ महराजांचे पारंपरिक भराडाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्रींचा पालखी मिरवणूक सोहळ्यामध्ये रगडा पथक,ढोल ताशा पथक , बँड, भजनी मंडळ यांचे सवाद्य मिरवणूक यावेळी रथाला फुलांनी सजविण्यात आले होते. यावेळी ग्राम प्रदक्षिणा करताना सणसवाडी गावातील हजारो महिला भगिनी अबालवृद्ध उपस्थित होते.गावातील घरासमोर व रस्त्यांवर सुंदर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तर मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी झाले होते यामध्ये महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती.

संध्याकाळी प्रसिद्ध कीर्तनकार संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचे सुश्राव्य कीर्तनानंतर माजी उपसभापती आनंदराव हरगुडे व माजी उपसरपंच बाबासाहेब दरेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, ग्राम पंचायत सदस्य राजेंद्र दरेकर,रामदास दरेकर,दगडू दरेकर,,माजी ग्राम पंचायत सदस्य कुंदा हरगुडे,निवृत्ती हरगुडे, संदीप भुजबळ, किसन हरगुडे,दिगंबर हरगुडे, संतोष दरेकर ,संतोष शिवले, काळूराम हरगुडे,पप्पू दरेकर,सुनील भोसुरे , काळूराम हरगुडे यांच्यासह अनेक मान्यवरांचे अनमोल योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सुरेख व देखणे आयोजन व नियोजन समस्त ग्रामस्थ सणसवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.भैरवनाथ भजनी मंडळ व पांडुरंग सेवा भजनी मंडळ यांची भजन व दिंडी मंडळ सप्ताह मंडळाने सहयोग केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पठाणराव हरगुडे यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!