(वडूज)खटावखटाव – दिनांक १८ फेब्रुवारी वडूज येथील बॉक्सर ग्रुप, शिवजन्मोत्सव सोहळा समिती मार्फत १४ वर्षांपासून अखंडपणे शिवजयंती उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. रुग्णाशी आपलं नातं घट्ट व्हावं यासाठी त्यांनी आयोजित केलेल्या शिबिराचे मुख्याधिकारी अमित पंडित साहेब यांनी कौतुक केले. पंडित साहेब यांच्या हस्ते रक्तदान शिबिर उद्घाटन समारंभ पार पडला.
यावेळी शिवजयंतीनिमित्त बॉक्सर ग्रुप करीत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. तसेच प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याची त्यांनी सूतोवाच केले. जय जिजाऊ जय शिवराय चा जयघोष करत यंदाच्या वर्षी तब्बल १०३ रक्त दात्यानी रक्तदानाचा हक्क बजावला. बॉक्सर ग्रुप दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर फक्त आयोजित करत नाही तर वेळ ,काळ आणि परिस्थिती मध्ये मागेपुढे न पाहता जिथे रक्ताची गरज असेल तुटवडा असेल तिथे रुग्णांपर्यंत थेट पोहचून एखाद्या व्यक्तीस जीवनदान लाभावे यासाठी प्रयत्नशील असतात. असे मत सर्व सदस्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या रक्तदान शिबिरामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजची टीम ने सर्व कामकाज पाहिले. यावेळी चे सर्व सदस्य सर्व शिलेदार मावळे उपस्थित होते.