प्रतिनिधी मिलिंद लोहार -पुणे
पुणे – कोरोना काळात अत्यंत मोठ्या प्रमाणावर हलाखीच्या परिस्थितीला सामोरे गेलेल्या रिक्षा चालकांना उत्पन्न नसल्याने त्यांच्यावर हलाखीची परिस्थिती ओढवलेली असताना नव्याने येणाऱ्या दुचाकीने टॅक्सी यांच्या आव्हानामुळे उपासमारीची वेळ येऊ लागली आहे याचा निषेध म्हणन रिक्षा चालकांनी संवैधानिक मार्गांनी आंदोलन करणाऱ्या रिक्षाचालकांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न काल पोलिसांनी केला असल्याची माहिती रिक्षा चालकांनी दिली आहे.
अटक करून घेण्यासाठी आंदोलांकर्त्यांमध्ये एकच झुंबड उडाली, व पोलिसांच्या गाड्या कमी पडल्याने आंदोलक स्वतः विविध पोलीस स्टेशन मध्ये अटक करून घेण्यासाठी पोहोचले, तसेच अटक झाल्यावर बघतोय रिक्षावाला च्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला.
सरकारच्या असल्या दडपशाहीला भीक न घालता, पोलीस स्टेशन मधून सुटल्या सुटल्या रिक्षाचालकांनी परत एकत्र येत आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.१-२ दिवसाचा ब्रेक घेऊन पुन्हा नव्या जोमाने आंदोलन सुरू करण्यात येईल.
बेकायदा बाईक टॅक्सी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील असे डॉ. केशव क्षीरसागर.यांनी सांगितले