Monday, June 17, 2024
Homeइतरबुर्केगाव येथे २३ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी १५ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बुर्केगाव येथे २३ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी १५ शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

बुर्केगाव येथे उसाच्या फडाला लागलेली आग

कोरेगाव भीमा – दिनांक ८ फेब्रुवारी

बुर्केगाव ( ता.हवेली) येथील उसाच्या फडाला सकाळी ११ च्या दरम्यान अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये सुमारे २३ एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असून यामध्ये एकूण पंधरा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असल्याची भावना शेतकर्यांनी व्यक्त केली. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. उसाला आग लागण्याची घटना घडल्याचे कळताच जवळपासच्या शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

उसाला आग लागल्याचे कळताच बुर्केगावचे तलाठी पवनकुमार शिवले , कोतवाल अशोक चव्हाण, वीजवितरणचे कनिष्ठ अभियंता मोरे ,वरिष्ठ तंत्रज्ञ राहुल लेंडे, कंत्राटी कामगार दीपक भोरडे यांनी तातडीने भेट दिली व पंचनामा केला आहे.

आण्णा गडधे, बाळासाहेब देवकर, संदीप गायकवाड,भाऊसाहेब डोमाळे, भाऊसाहेब भोरडे, मल्हारी डोमाळे, बाळू ठोंबरे, अंकुश जांभळकर, रामदास शिंदे,राजू जांभाळकर, सतीश डोमाळे,निर्मला शिंदे, विजय शिंदे, यशवंत गडधे, गुलाब शिंदे या १५ शेतकऱ्यांचा सुमारे २३ एकर ऊस जळाला आहे.

माझा स्वतःचा पाच एकर व इतर शेतकऱ्यांचा मिळून साधारण २३ एकर ऊस जळाला आहे.आगीचे कारण समजले नाही आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

  • – विजय शिंदे , शेतकरी बुर्केगाव

वीज तारांमुळे आग लागली नसून तेथील ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला असून तेथे वीज प्रवाह खंडित होता त्यामुळे या आगीला महावितरण जबाबदार नाही.

  • अंकुश मोरे , सहाय्यक अभियंता,शाखा पेरणे ,वीज वितरण महामंडळ
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!