Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याबी जे एस विद्यालयात बी. आय.एस. अंतर्गत पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

बी जे एस विद्यालयात बी. आय.एस. अंतर्गत पोस्टर प्रदर्शन स्पर्धा संपन्न

वाघोली (ता.हवेली) कोणतीही वस्तू आपण खरेदी केली, तर ती भारतीय मानक आहे की नाही,हे तपासून घेणे सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने समाज मनात जागृती निर्माण झाली पाहिजे यासाठी भारतीय मानका बद्दल जागृती असली पाहिजे तरच ग्राहकरूपी राजा समाधानी होईल व समाजामध्ये, विद्यार्थीरुपी भावी पिढीमध्ये हक्कांचा उपयोग करून ग्राहकांचे हित जोपासण्याची समाज व्यवस्था निर्माण होण्याची दृष्टीने भारतीय मानक महत्त्वाचे कार्य करते असे मत बी. आय.एस. चे स्टॅंडर्ड प्रमोशन ऑफिसर हर्षमोहन शुक्ला यांनी व्यक्त केले.

या पोस्टर प्रेझेंटेशन कार्यक्रमासाठी बी.आय.एस.चे हर्षमोहन शुक्ला तसेच विद्यालयाचे प्राचार्य शसंतोष भंडारी, पर्यवेक्षक पांडुरंग पवार, बी. आय.एस. क्लबच्या विद्यालय प्रमुख स्मिता शिंदे तसेच मराठी विषयाच्या शिक्षिका जयश्री दहिफळे उपस्थित होत्या.
या स्पर्धेमध्ये क्लबच्या जवळपास ११० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व भारतीय मानक ब्युरोच्या विविध उत्पादना विषयांचे पोस्टर बनवले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!