Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रबी जे एस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे...

बी जे एस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन…

गांधी तीर्थ फाउंडेशन जळगाव यांचा उपक्रम

वाघोली (ता.हवेली) भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गांधी तीर्थ स्वच्छ शाळा अभियानाअंतर्गत गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन १० ऑक्टोबर व शुक्रवार, दिनांक १३ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.यामध्ये विद्यालयातील १४५८ विद्यार्थी व ४६ शिक्षक सहभागी झाले होते.

या परीक्षेमध्ये दिव्यांग ( हाताला अपंगत्व) असणारी ज्ञानेश्वरी बढे या विद्यार्थिनीने उत्स्फूर्त सहभागी होत मोठ्या कष्टाने गांधी विचार व्यक्त करत उत्सफुर्त सहभाग घेतला ही विशेष बाब होती.

    या परीक्षेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समग्र जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी व  त्यांचे व्यक्तिमत्व , विद्यार्थी जीवन ,त्यांनी विद्यार्थ्यांना दिलेले अनमोल संदेश व बुनियादी शिक्षा अशी अनेक पुस्तके अभ्यासण्यासाठी देण्यात आली होती. यामध्यामातून विद्यार्थ्यांच्या अंगी अहिंसा, सात्विक विचार, स्वच्छता ,देशप्रेम वृध्दींगत होण्यासह एक परिपूर्ण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रपिता महात्मा गांधी याअंचे विचार त्यांच्या जीवनात रुजवण्याची प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.

    विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार सत्य अहिंसा व शांती हे विचार रुजवणे आवश्यक आहे. स्वच्छतेला जीवनात प्राधान्य असले पाहिजे तसेच गांधी विचारांचा  समृद्ध वारसा पुढच्या पिढीत संक्रमित करण्याच्या उद्देशाने असे विविध उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी केले.

  गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय अभियानात बी.जे.एस स्कूल वाघोली सहभागी शाळा असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यामध्ये श्रमदान, स्वच्छवर्ग, परिसर सफाई ,वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा,पोस्टर कॉम्पिटिशन तसेच महात्मा गांधी विचारांची लोक जागृती असे अनेक उपक्रम विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असून यामध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक उस्फूर्तपणे सहभागी होत आहेत. गांधी तीर्थ फाउंडेशन जळगाव यांचा हा उपक्रम राज्यभर शाळांमध्ये राबविण्यात येत आहे,अशी माहिती गांधी तीर्थ स्वच्छ शाळा अभियानाची समन्वयक प्रा.स्मिता शिंदे व प्रा. बाबासाहेब गव्हाणे यांनी दिली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!