दि. ०६ व ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती अंतर्गत आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग मुले/मुली स्पर्धा बी.जे.एस महाविद्यालयात संपन्न झाल्या. एकूण ३० महाविद्यालयातील १०० मुले मुली खेळाडूंनी सह्भाग घेतला. स्पर्धेमध्ये बी.जे.एस महाविद्यालयास मुलींच्या गटांमध्ये विजेतेपद मिळाले तर एआयटी दिघी महाविद्यालयास यांना उपविजेतेपद मिळाले. मुलांच्या गटांमध्ये एआयटी दिघी महाविद्यालयांना विजेतेपद मिळाले तर बी.जे.एस महाविद्यालयास उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे , गोपाळ देवांग, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पद्माकर फड, प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी डॉ. एस.व्ही. गायकवाड , डॉ. बळवंत लांडगे, डॉ. भूषण फरतडे, प्रा. अंगद साखरे, प्रा. सिद्धेश्वर सांगोळे, प्रा. समीर मोरे उपस्थित होते स्पर्धेचे संयोजन डॉ. रमेश गायकवाड, प्रा. सूर्यकांत दुधभाते, गिरीशकुमार शहा, प्रा. वैभव केसकर प्रा. सचिन कांबळे, म्ह्स्कू शिंगाडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. स्पर्धेमधून खालील खेळाडूंची निवड पुणे जिल्ह्याच्या संघात झाली : सुवर्णपदक विजेते ५ खेळाडू (यश गौड, कुणाल मोरे, आकाश मोरे, तेजवीर कौर, धनश्री पिंपळे) रौप्य पदक विजेते २ खेळाडू (साक्षी सोनवणे, आरती जगताप) व कांस्य पदक विजेते २ (दिव्या चव्हाण, वैष्णवी जाधव) सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे पदाधिकारी, मार्गदर्शक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन.