Monday, September 16, 2024
Homeताज्या बातम्याबी.जे.एस महाविद्यालयात " प्राणी जागरुकता ” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

बी.जे.एस महाविद्यालयात ” प्राणी जागरुकता ” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन

वाघोली – भारतीय जैन संघटनेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे रोजी “प्राणीजागरुकता (Animal Awareness)” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर. सचिन पाटील वैज्ञानिक ब. भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था (Zoological survey of India) तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड सर, IQAC Coordinator डॉक्टर माधुरी देशमुख, विज्ञान शाखाप्रमुख डॉक्टर मनीषा बोरा उपस्थित होते. याप्रसंगी ३ विविध व्यक्तींचे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना लाभले. सर्वप्रथम डॉ. सचिन पाटील यांनी विध्यार्थ्यांना स्पायडर वर्गीकरण या बद्दल व्याख्यान दिले. स्पायडर विश्वातील अचंबित करणाऱ्या गोष्टी विध्यार्त्याना सांगितल्या.त्यानंतर मिस तनुश्री रक्षित (एस.ए.एस ),वाइस प्रेसिडेंट (ऑपरेशनल राष्ट्रीय संघटना) आणि त्यांच्या सह्चारिका मिस सरोज सोपरकर (एस.ए.एस) यांनी विध्यार्थ्यांना प्राणी संरक्षण व प्राण्यांचे अधिकार, त्यांच्यावर होणारे अत्याचार व त्या विरोधातील कारेवाई या विषयावर माहिती दिली.कार्यक्रमाचे तिसरे अथिती सर्पमित्र साईदास कुसळ यांनी सर्वाना विषारी व बिन विषारी साप कसे ओळखावेत याविषयी ज्ञान दिले तसेच आपल्या परिसरात आढळणाऱ्या विविध सापाबद्द्दल माहिती दिली आणि सर्पदंश झाल्यावर काय प्रथमोपचारकरावे याचेही मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास बी.जे.एस .विद्यालयातील एफ.वाय. व एस.वाय.बीएससी चे विधार्थी तसेच इतर महाविद्यालयातील असे एकुण ७२ विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयात WILDLIFE WEEK अंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणा करण्यात आली. प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर तेजल देवकर आणि डॉक्टर सादिया शेख यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच या कार्यशाळेसाठी एफ.वाय. व एस.वाय.बीएससी च्या विधार्थ्यांचे खूप सहकार्य लाभले. बी.जे.एस. प्रकल्प व्यवस्थापक माननीय साळुंके सर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय गायकवाड सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!