Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्याबीजेएस महाविद्यालयात तेरावे धर्ममैत्री विचारवेध साहित्य संमेलन संपन्न

बीजेएस महाविद्यालयात तेरावे धर्ममैत्री विचारवेध साहित्य संमेलन संपन्न

वाघोली – ‘राष्ट्रीय एकात्मतेसाठी धर्मसहिष्णुता आणि सामाजिक समता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.’ असे मत संमेलनाध्यक्ष प्रा. प्रदीप कदम यांनी धर्ममैत्री विचारवेध साहित्य संमेलनात व्यक्त केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावे धर्ममैत्री विचारवेध संमेलन संपन्न झाले.संमेलनाचे उद्घाटन डॉ. अशोक पगारिया यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक श्री.सुरेश साळुंके, शंकर आथरे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरुवात धर्ममैत्री प्रबोधन यात्रा आणि ग्रंथदिंडीने झाली.

संमेलनात डॉ. संजय गायकवाड यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ आणि विद्यार्थ्यांना ‘बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’, कवींना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ तर शिक्षकांना ‘बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी, ‘थोर समाजसुधारकांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिल्यामुळे समाज मानवतावादाकडे जाऊ लागला, आजही त्या महापुरुषांचे विचार समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत. असे मत समारोप प्रसंगी व्यक्त केले.
या प्रसंगी शंकर आथरे यांच्या ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज’, मधुराणी बनसोड यांच्या ‘सन्मार्ग’ काव्यसंग्रह तर डॉ. सिद्धेश्वर गायकवाड यांच्या ‘मराठी नाटकों के हिंदी रुपांतरण का अनुवादपरक अनुशीलन’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कवी चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता झिंजुरके तर आभार डॉ. सहदेव चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!