Thursday, June 20, 2024
Homeकृषिबिबट्याच्या जबड्यातून पतीची मान सोडवण्यासाठी बिबट्याचा प्रतिकार करत शेतमजूर पत्नीने वाचवले...

बिबट्याच्या जबड्यातून पतीची मान सोडवण्यासाठी बिबट्याचा प्रतिकार करत शेतमजूर पत्नीने वाचवले नवऱ्याचे प्राण….

बिबट्याने पतीची मान पकडलेली असातानाही मोठ्या धेर्याने लाकडाने त्याच्यावर हल्ला चढवत राखले कुंकू

पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नानगाव येथे एक शेतमजुर पतीला त्याच्या पत्नीने बिबट्याच्या तावडीतून सोडवले. मोठ्या शिताफीने तिने या प्रसंगाचा सामना केला.यामुळे या महिलेने कौतुक केले जात आहे.या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.
काशिनाथ बापू निंबाळकर यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या पत्नी सरूबाई निंबाळकर यांनी प्रतिहल्ला करत बिबट्याला परतवून लावत आपल्या पतीच्या प्राणांचे रक्षण केले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

निंबाळकर यांच्या घराभोवती ऊस आहे. काशिनाथ निंबाळकर हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर आले होते. याचदरम्यान बिबट्याने काशिनाथ यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने निंबाळकर यांची हनुवटी जबड्यात पकडली.

अचानक झालेल्या या हल्ल्याने निंबाळकर मोठ्याने ओरडले. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी सरुबाई व त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावून आले. हे दोघे अक्षरशः बिबट्यावर तुटून पडले.

काशिनाथ हे बिबट्याचा प्रतिकार करत असतानाच त्यांच्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली आणि सरुबाई यांनी लाकडाने प्रहार करत बिबट्यावर हल्ला चढवला. यामुळे बिबट्या येथून पळून गेला. यामध्ये निंबाळकर जखमी झाले आहेत.दरम्यान, पतीवर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे पाहून अंगाचा थरकाप उडाला होता. पण पतीचा जीव धोक्यात पाहून मागे हटले नाही. हातात लाकूड घेऊन बिबट्यावर हल्ला चढवला आणि पतीला संकटातून सोडवले.

यामध्ये मुक्या प्राण्यावर आपण प्रेम केलं तर ते आपण संकटात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मालकाचा जीव वाचवते हा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून मालकासाठी बिबाट्याच्या अंगावर झेप घेत त्याला पाळायला भाग पाडणारा कुत्रा हा ही दौंड तालुक्यात चर्चेचा व इमानदारीचा विषय ठरला आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!