Friday, May 24, 2024
Homeताज्या बातम्याबार्टीची पुस्तके खरेदी करण्यासाठी भीम अनुयायांचा उदंड प्रतिसाद

बार्टीची पुस्तके खरेदी करण्यासाठी भीम अनुयायांचा उदंड प्रतिसाद

बार्टीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सूट मिळाल्याने अनुयायांकडून मोठ्या प्रमाणावर ग्रंथ संपदा खरेदी

कोरेगाव भिमा – कोरेगाव भिमा – पेरणे येथे संपन्न होणाऱ्या २०६ व्या विजय स्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज इत्यादी महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके खरेदी करत अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर व पुस्तकांचे अतूट नाते तसेच त्यांची प्रचंड ग्रंथ संपदा यांचा आदर्श सर्व समाज बांधवांनी कृतीत आणत मोठ्या प्रमाणावर विविध पुस्तकांची खरेदी करण्यात आली यावेळी राज्यघटना, घटनेची उद्देशिका,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो,सही, बुद्ध प्रतिमा यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. 

  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची पुस्तके, सदर माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज इत्यादी महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध उपलब्ध होती. सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेले आहे.

पुस्तक प्रदर्शनाला ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विस्डोम बुक फेअर’ असे नाव – भारतीय घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाला १०० वर्ष पूर्ण झाल्याने विशेष आयोजन करण्यात आले होते.

      विजय स्तंभ परिसरात ‘बुक फेअर’ चे आयोजन करण्यात या पुस्तक प्रदर्शनाला ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विस्डोम बुक फेअर’ असे नाव देण्यात आले आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ ग्रंथाला १०० वर्ष होत असल्याने हा ग्रंथ व त्यातील विचार जास्तीत जास्त अनुयायांपर्यंत पोचावेत, यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेले ग्रंथ तसेच घटनेची उद्देशिका यांची छपाई केली असून अनुयायांना  पुस्तके कमी पडणार नाही यासाठी बार्टी संस्थेने काळजी घेतली होती.

   यावेळी २४६ बुक स्टॉलवर पुस्तके व आंबेडकरी साहित्य,पुतळे,बॅच,झेंडे व इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!