पुणे – बारामती येथे क्षत्रिय सगर राजपूत (सगर मराठा) संघटनेच्या वतीने ‘क्षत्रिय सगर सुर्यवंशी यशोगाथा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुजरात येथील प्रसिद्ध लोककलाकार मंगलभाई राठोड आणि त्यांचे सहकलाकार संगीतमय कार्यक्रमातून सगर राजपूत समाजाचा महाराष्ट्रातील इतिहास मांडणार आहेत.( The success story of the Sagar Rajput community will unfold in a historic event at Baramati on Sunday)
रविवार दिनांक ३० जुलै २०२३ रोजी चिराग गार्डन, बारामती येथे दुपारी २.३० ते संध्याकाळी ७.३० या वेळात हा कार्यक्रम होणार आहे. एक हजार वर्षांपासून सगर राजपूत घराण्याचा मूळ संदर्भासहित उलगडणार इतिहास नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील(Inspector General of Police Dr. B. G. Shekhar Patil) हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील, तर क्षत्रिय राजपूत करनी सेनेचे ( Rajput Karani Sena)राष्ट्रीय उपाध्यक्ष राज शेखावत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, सुप्रसिद्ध हिंदी हास्यकवी टी.व्ही. कलाकार शंभू शिखरजी, पराग बेडसे, महेश दास, प्रमोद राणाजी, संभाजी ब्रिगेडचे अमोल काटे, मुकुंद काकडे, प्रशांत सातव, मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध विधिज्ञ सुधीर पाटसकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे. (History of Rajput Society)
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील लोकांनी, तसेच इतिहासप्रेमी मंडळींनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रणजीत ताम्हाणे यांनी केले आहे.(History of Rajput Society)