Monday, June 17, 2024
Homeताज्या बातम्याबाभुळसर राव लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने नेत्रतपासनी शिबिर संपन्न

बाभुळसर राव लक्ष्मी फाउंडेशनच्या वतीने नेत्रतपासनी शिबिर संपन्न

२६ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, २१५ चष्म्यांचे वाटप तर एकूण २३८ रुग्णांची तपासणी

कोरेगाव भीमा – बाभुळसर (ता.शिरूर) येथे स्वर्गीय माजी आमदार रावसाहेब दादा पवार यांच्या १०६ व्यां जयंतीनिमित्त भव्य डोळे तपासणी, मोतीबिंदू भिंगारोपन व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गणेगाव दुमाला पंचक्रोशीतील नागरिकांनी व वृद्धांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राव लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून एक सामाजिक विधायक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये २६ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, २१५ चष्म्यांचे वाटप तर एकूण २३८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

२४ मे रोजी बाभुळसर येथे राव लक्ष्मी फाऊंडेशन व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत डोळे तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू भिंगारोपान शस्त्रक्रिया शिबिर, मोफत चष्मे वाटप शिबिराचे यशस्वीरीत्या संपन्न झाले याचा ग्रामीण भागातील नागरिक,शेतकरी,कष्टकरी व मजुरांना याचा मोठा लाभ झाला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!