धुरळा व कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने नागरिक व प्रवाशी त्रस्त
कोरेगाव भीमा – दिनांक ३० मे
कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथे पुणे नगर महामार्गाचे काम सुरू असून महामार्गावर अंदाजे दोन ते अडीच फूट थराची खडी पसरल्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती यामध्ये अनेक दुचाक्या घसरल्या तर खडीवरून वाहने सावकाश चालवावी लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली त्यात विरुद्ध दिशेने वाहने आल्याने पुणे नगर महामार्ग कोंडीत सापडला यामुळे सर्वसामान्य नागरिकांना व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागले रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रवाशी मात्र सकाळपासून दुपारी एक वाजेपर्यंत वाहतूक जाम झाल्याने सर्वजण हैराण झाले होते तर कोरेगाव भीमा ग्रामस्थ व व्यापारी वाहनांच्या कर्णकर्कश आवाजाने व धुराळ्याने त्रासून गेले होते.वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या .
बांधकाम विभाग , संबधित ठेकेदार यांचा गलथान कारभार – प्रशासनाचा ढिसाळ व गलथान कारभाराचा फटका प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर बसला असून रस्त्याचे काम सुरू आहे वाहने सावकाश चालवा , दिशा दर्शक व सूचना फलक लावण्यात आले नव्हते ,वाहतूक नियंत्रित व सुरळीत सुरू राहण्यासाठी कसलीही काळजी घेण्यात आली नव्हती तर यासाठी आवश्यक असा कर्मचारी वर्ग ठेवण्यात आला नसल्याने प्रवाशांना रविवार सुट्टीचा दिवस हा वाहनात अडकून उन्हाच्या तीव्र झळांमध्ये व उकाड्यात घालवावा लागला. यामुळे वाहतूक कोंडी होण्यास कारणीभूत असणारे बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी कोणतीही काळजी घेतल्याचे दिसले नाही यामुळे नागरिकांना व प्रवशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पुणे नगर महामार्गाचे काम सुरू असून प्रवाशांनी कोरेगाव भीमा गावच्या नावाने वाहतुकीची समस्या कायमच असून इथेच नेमके जाम होते असे म्हणत प्रवाशांनी कोरेगाव भीमा गावाविषयी रोष व्यक्त केला पण यात ग्रामस्थांची कसलीही चूक नसून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका असला तरी कोरेगाव भीमा गावावर प्रवशांनी नाराजी व्यक्त केली.चूक एकाची आणि दोष दुसऱ्याला हा प्रसंग पाहायला मिळाला.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्याय काय –सकाळ पासून वाहतूक कोंडी मोठ्या झाली होती यामध्ये कंपनी कामगार ,प्रवाशी यांची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती त्यात वाहनचालकांनी चुकीच्या दिशेने गाड्या आणल्याने आणखीनच समस्या वाढली अत्यावश्यक सेवा असणाऱ्या वाहनासाठी वाहतुकीच्या कोंडीपासून सुटकेसाठी सक्षम व पर्यायी व्यवस्था ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाहतूक कोंडीमध्ये अत्यावश्यक सेवा असणाऱ्या वाहनांसाठी रस्ता उपलब्ध राहील यासाठी नागरिक व प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
वाहतूक कोंडी रुग्णांच्या जीवावर बेतू नये यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्त , प्रशासन व संबधित ठेकेदार यांनी आवश्यक त्या उपाययोजना करायला हव्यात ज्यामुळे नागरिकांना वेळेत मदत व उपचार मिळू शकेल. यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करायला हवे वाहने रांगेत नियमाचे पालन करत व कर्णकर्कश हॉर्न वाजवणे टाळून शांततेत व सुरक्षित प्रवास करण्यासाठी प्रयत्न करायला हवा.
लोका सांगे ब्रम्हज्ञान –वाहतूक कोंडी सुटायला हवी ,वाहने रांगेत यायला हवी,प्रशासनाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडायला हवी,सूचना फलक व इतर नियमांचे पालन करायला हवे हे पोटतिडकीने सांगणारे मात्र वाहतूक कोंडीत विरुद्ध दिशेने वाहन चालवत इतरांना उपदेशाचे डोस देणारे मात्र दिसत होते .लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण असे अनेक जण नागरिकांची करमणूक करताना दिसले नागरिकही त्यांची समाजाविषयी बोलघेवडे पणा पाहून आनंद घेत होते.वाहतूक कोंडीच्या नावाने घसा काढण्यापेक्षा प्रत्येकाने स्वयंशिस्तीचे व कर्तव्याचे पालन करायला हवे यासाठी प्रशासनाने योग्य ती काळजी घेत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न कायला हवेत.
पुणे -नगर महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनचालकांनी स्वयं शिस्तीचे पालन करायला हवे,कोरेगाव भीमा येथील वढू चौक , डींग्रजवाडी फाटा येथे वाहतूक कर्मचारी ठेवण्यात यावे ,सूचना फलक व आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देत वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करायला हवे यासाठी प्रशासन व नागरिकांचा समन्वय साधने गरजेचे आहे.