Tuesday, October 15, 2024
Homeक्रीडाफ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ...

फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

कोरेगाव भीमा – दिनांक ३० ऑगस्ट

कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील फ्रेंड्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित फ्रेंड्स नर्सरी प्रायमरी सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक कराटे संघटनेच्या वतीने बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय चाचणी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून नॆशनल ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल १) कु. आराध्या आकाश काशीद (कांस्य पदक). २) कु. प्रणीत विठ्ठल मैन्दाड (कांस्य पदक). ३) कु. ज्ञानेश्वरी दत्तात्रय गावडे या विद्यार्थिनीने आळंदी येथे झालेल्या आंतरशालेय कुस्ती स्पर्धे मध्ये ४२ कि. वजन गटामध्ये सिल्वर मेडल मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला.

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे, शाळेचे सचिव दिलीप भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वस्ताद योगेश भांडवलकर , मुख्याध्यापक मदन हराळ, पर्यवेक्षिका नायर अजीथाकुमारी , दत्तात्रय गावडे, संदीप यशवंत, गणेश गायकवाड, गणेश भंडारे, भारत लोंढे, संतोष भोगे उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष राजाराम ढेरंगे व संस्थेचे सेक्रेटरी दिलीप भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भालेराव सुरेखा तर दरेकर सर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!