Thursday, June 20, 2024
Homeइतरफोन पे द्वारे पैसे दिल्याचे भासवून ९ सराफांची फसवणूक करणाऱ्यास ८ लाखांच्या...

फोन पे द्वारे पैसे दिल्याचे भासवून ९ सराफांची फसवणूक करणाऱ्यास ८ लाखांच्या मुद्देमालासह अटक

प्रतिनिधी सुनील थोरात हवेली

हडपसर- हडपसर ( ता.हवेली) याबाबत रामेश्वर नंदलाल वर्मा रा . एमनोरा टाऊनशिप हडपसर पुणे यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून फिर्यादीनुसार मिळालेलीमाहिती अशी की,

रामेश्वर नंदलाल वर्मा यांचे रोनक ज्वेलर्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे . त्यांचे दुकानात दिनांक २४ जानेवारी रोजी आकाश तुपे नावाचा इसम येवून त्याने सोन्याचीं अंगठी पाहायची आहे असे सांगून अंगठी पसंत करून ५ ग्रॅम ४८० मिली वजनाची अंगठी पंसत करून त्याचे फोन पे द्वारे पेमेंट झाले आहे असे भासवून अंगठी घेवून जावून फसवणूक केल्याने हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता .

हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून तांत्रीक विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ व सुरज कुंभार यांना मिळालेल्या बातमीद्वारे हडपसर पोलीसांनी आरोपी विशाल माणीक घोडके (वय २८ वर्ष रा . होलेवस्ती , होले बिल्डींग , उंड्री पुणे) यास ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे घेवून येवून त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याने सांगीतले की , मागील २ महिन्याचे कालावधीमध्ये त्याने पुणे शहरातील तसेच लगतच्या भागातील वेगवेगळ्या सोनारांच्या दुकानात जावून सोन्याचे दागीने पाहून ते दागीने खरेदीच्या वेळेस त्याचे जवळ असलेल्या मोबाईल फोन मध्ये असलेल्या फोन पे या पेमेंट एप्लिकेशन मधून सोनाराचे दुकानातील पेमेंट ॲपचे स्कॅनर स्कॅन करून पेमेंट फेल झाले आहे याचा स्क्रीन शॉट काढून तो स्क्रीन शॉट क्रॉप करून समोरील दुकानदारास फेल स्क्रीन शॉट वरील युटीआर क्रंमाक देवून पेमेंट झाले आहे असे भासवून त्यांचे दुकानातुन सोन्याचे दागीने हे घेवून जात असे . परंतु काहीवेळेस सोन्याचे दुकानादारास पेमेंट न आल्याने त्यांनी दागीने दिले नाहीत असे सांगीतले . त्याने एडीट केलेले स्क्रीन शॉट वरून आता पर्यंत सुमारे १४ लाख रूपयाहून अधिक ट्रांन्जीक्शन तसेच ५० पेक्षा अधिक सोन्याचे दुकानात फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले असून सदर आरोपीस ६ दिवस पोलीस कोठडी मिळाली असून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

आरोपी विशाल माणीक घोडके याचेकडे केले तपासात त्याने हडपसर , वानवडी , चंदननगर , भारती विदयापीठ , जेजुरी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण हद्दीत एकूण ०९ गुन्हे उघडकीस आले असून ३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने व सेलेरिओ कार असा एकून ८ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे . आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त व पुर्व प्रादेशिक विभाग पुणे नामदेव चव्हाण , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर नम्रता पाटील यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त , हडपसर विभाग पुणे ,बजरंग देसाई, , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर स्टेशन अरविंद गोकुळे , पुणे शहर विश्वास डगळे , पोलीस निरीक्षक दिगबंर शिंदे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे , पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे , पोलीस अंमलदार , प्रदीप सोनवणे , अविनाश गोसावी , संदीप राठोड , समीर पांडुळे , शशिकांत नाळे , सचिन जाधव , शाहीद शेख , प्रशांत दुधाळ , निखील पवार , प्रशांत टोणपे , रियाज शेख , सचिन गोरखे , सुरज कुंभार यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!