Saturday, July 27, 2024
Homeशिक्षणफुलगाव येथे प्रजासत्ताक दिनी नवोदित चित्रकारांचा सत्कार.

फुलगाव येथे प्रजासत्ताक दिनी नवोदित चित्रकारांचा सत्कार.

येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरेगाव भीमा – फुलगाव ( ता.शिरूर)

येथील हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयात देखील कोरोनाचे सर्व नियम पाळून ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयातील इयत्ता दहावी मधील दोन नवोदित चित्रकार प्रज्योत शिंदे व सर्वज्ञ खळदकर या विद्यार्थ्यांनी कोरोणाच्या काळात अनेक वेगवेगळ्या नेत्यांची, क्रांतिकारकांची , सेलिब्रिटीची स्केचेस चित्रे तयार केली आहेत.

प्रज्योत शिंदे याने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे तर सर्वज्ञ खळदकर याने अनाथांची माय सिंधुताई सपकाळ व CDS बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स यांचे स्केचेस चित्र तयार केले आहे. या तिन्ही चित्र रेखटनाचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . दोन्ही विद्यार्थी विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीरंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचा सराव करतात. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांमुळे त्यांचे प्रजासत्ताक दिनी उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले व त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायणराव खुळे व सरपंच मंदा साकोरे , उपसरपंच योगेश कोळपकर यांचे हस्ते करण्यात आले. फुलगाव श्री शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व पालक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद वाखारे सर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे प्रास्ताविकामध्ये स्वागत केले तर श्री केकान सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सर्व मान्यवरांचे आभार मानले.

“दरवर्षी हरी उद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात आपले कलागुण सादर करत असतात..स्वागतगीत, कवायत,लेझिम,गजी नृत्य,दोरी मल्लखांब,लाकडी मल्लखांब,भजन, या विविध कला विद्यार्थी पाहुंन्यासमोर सादर करत असतात.मात्र गेली दोन वर्षे कोरोना मुळे कुठलेच सन उत्सव साजरे करता आले नाही.भविष्यात कोरोना गेल्यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी पुन्हा त्याच जोमाने प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनी आपल्या कला सादर करतील.”

शरद वाखारे सर, मुख्याध्यापक एच. यू .डी .विद्यालय फुलगाव

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!