Monday, October 14, 2024
Homeक्रीडाफीफाने (FIFA) ची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर मोठी कार्यवाही ( FIFA...

फीफाने (FIFA) ची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर मोठी कार्यवाही ( FIFA ban India)

फिफाने (International Federation of Association Football) अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर (AIFF) मोठी कारवाई केली आहे. फिफाने भारतीय फुटबॉल फेडरेशनला तात्काळ प्रभावाने निलंबित (Fifa Suspend AIFF) केले आहे.

फिफाने (जागतिक फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळ) १५ ऑगस्ट च्या दिवशी स्वातंत्र्याचा अमृत मोहोत्सव साजरा करत असताना भारतीय फुटबॉल महासंघाचे ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या १७ वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढण्यात आले आहे . तिसऱ्या पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन फिफाने ही कारवाई केली आहे.

जागतिक फुटबॉलच्या प्रशासकीय मंडळाने (फिफा) “फिफा कायद्याचे गंभीर उल्लंघन” प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे म्हटले आहे. कोर्टाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नियामक मंडळ बरखास्त केल्यामुळे फिफाने हा निर्णय घेतला आहे. नवीन नियामक मंडळाची नियुक्ती होऊन सर्व अधिकारी पूर्णपणे सत्तेवर असतील आणि त्यामधील दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवतील तेंव्हा निलंबन मागे घेतले जाईल. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ निलंबित झाल्याने १७ वर्षं आतील वयोगटातील महिला विश्वचषकाचे यजमानपद हातून निसटले आहे. तसेच याचा परिणाम इतर स्पर्धांवरही होईल, ज्यामध्ये भारत सहभागी होऊ शकणार नाही.

https://twitter.com/BluePilgrims/status/1559286328311033857?s=20&t=L_q_RiNs2E8MUPt-QUqt2g

https://twitter.com/BluePilgrims/status/1559286328311033857?s=20&t=L_q_RiNs2E8MUPt-QUqt2g
संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!