अवघ्या पाच दिवसात २३० सी सी टी व्हि कॅमेरे तपासत आरोपी निष्पन्न आरोपींमध्ये मयताची पत्नी ,मुलगी व तिचा प्रियकर यांचा समावेश
कोरेगाव भीमा – सणसवाडी ( ता.शिरूर) दिनांक १ जून रोजी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून एका अनोळखी पुरूष जातीच्या इसमाचा खुन करून पुरावा नष्ट करण्याचे हेतुने प्रेत पेट्रोल टाकुन जाळुन टाकले होते. मृतदेह हा पुर्णतः जळालेला असल्याने त्याची ओळख पटवणे अत्यंत अवघड आवाहन पोलिसांनी २३० सी सी टी व्ही कॅमेरे तपासत संशयित वेग्नोर गाडीचा तपास करत गुन्हेगारांपर्यंत पोचाण्यात यश आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना वॅग्नोर कार नं एम. एच. १२ सी.के. ३१७७ वाहन वडगाव शेरी परीसरातील असून सदरची गाडी जाँय कसबे रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे याचे कडे चौकशी केली असता, दि ३१ मे रोजी त्याचेकडील वॅग्नोर कार त्याचा मुलगा अॅग्नेल जॉय कसबे हा घेवून गेला असल्याचे सांगितले. अँग्नेल जॉय कसबे (वय २३ वर्षे), रा. साईकृपा सोसायटी वडगाव शेरी पुणे याला ताब्यात घेवून त्याचे कडे चौकशी करता सॅन्ड्रा जॉन्सन लोबो (वय ४३ वर्षे), रा. वडगाव शेरी पुणे, व एक विधीसंघर्षीत बालिका यांनी संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच मयत व्यक्तीचे नाव जॉन्सन कॅजीटन लोबो, वय ४९ वर्षे, रा. ए १६, वडगाव शेरी पुणे असे असल्याचे सांगितले.
यातील आरोपी मयताची सॅन्ड्रा लोबो पत्नी यांनी खुन केल्यानंतर नातेवाईकांना व शेजारी यांना समजु नये म्हणून त्यांनी मयताचा फोन चालूच ठेवून त्यावरून रोज व्हॉटसअप स्टेटस ठेवणे सुरू केले होते. मयताची पत्नी सॅन्ड्रा लोबो
हीचा वाढदिवस दि. ४ जूनला होता त्यावेळी आरोपी अँग्नेल कसबे याने मयताचे मोबाईल वरून पत्नीचे वाढदिवसाचे स्टेटस ठेवले जेणेंकरून मयत हा जिवंत आहे असे भासवले व गुन्हा लपवून तपास यंत्रणेची तसेच नातेवाईकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा बारकाईने तपास करून गुन्हा उघडकीस आणला व संबधित गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या.
सदरचा गुन्हा हा मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकीत गोयल,अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, शिरूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, , उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव, दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण प्रमोद क्षिरसागर, शिक्रापूर पोलीस स्टेशन वैभव पवार, महादेव शेलार, नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, अभिजीत सावंत, अमोल खटावकर, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक फौजदार तुषार पंदारे, जितेंद्र पानसरे, पो.हवा.जनार्धन शेळके, राजु मोमीन, योगेश नागरगोजे, अमोल दांडगे, श्रीमंत होनमाने, पोलीस नाईक विकास पाटील, शिवाजी चितारे, निखील रावडे, किशोर शिवनकर, यांनी उघडकीस आणलेला असून सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर , पोहवा सचिन होळकर, चंद्रकांत काळे शिकापुर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.