Monday, October 14, 2024
Homeशिक्षणप्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सर्वाधिक मतांनी विजयी

प्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील अर्थशास्त्र अभ्यास मंडळावर सर्वाधिक मतांनी विजयी

तळेगाव ढमढेरे ( ता.शिरूर )

शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ वसंतराव पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत तिन्ही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते घेऊन प्रथम फेरीमध्ये विजयी झाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाच्या निवडणूकीची मतमोजणी विद्यापीठ आवारामध्ये संपन्न झाली. या निवडणुकीमध्ये विद्यापीठ परिक्षेत्रातील पुणे अहमदनगर, आणि नाशिक जिल्ह्यामधील सर्व महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुखांनी सहभाग घेतला.

या विजयाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, सचिव अरविंद ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल मधील मुख्याध्यापिका व सर्व स्टाफ व संस्थेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. सोमनाथ पाटील यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!