Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्याप्रहार संघटना कोरेगाव भिमा यांच्या वतीने आमदार बच्चु कडू यांचा वाढदिवस मोठ्या...

प्रहार संघटना कोरेगाव भिमा यांच्या वतीने आमदार बच्चु कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता. शिरूर)येथे प्रहार संघटनेचे संस्थापक व दिव्यांग बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर ती काम करत असणारे तसेच दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यासाठी मोलाची कामगिरी करणारे आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांचा वाढदिवस मोठ्या आनंदात व उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांग बांधवांच्या वतीने आमदार बच्चू कडू यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येऊ वर्ग भिमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांच्या उपस्थिती केक कापण्यात आला.

यावेळी कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे ,प्रहार संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे, राजश्री भांडवलकर, अशोक ढेरंगे, उद्योजक सुनील ढेरंगे, बापूसाहेब दौंडकर, सोमनाथ घावटे, दशरथ गव्हाणे, रेश्मा कडलक, संजय कानडे, मल्लिकार्जुन लोहार, सागर घावटे, छाया सूर्यवंशी, वंदना शिरतोडे, बलभीम मेटे, प्रसाद सुपेकर, अमृता कांगणे,मुथा व परशुराम घावटे उपस्थित होते

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!