Wednesday, April 24, 2024
Homeक्राइमप्रशासन हतबल...चोर मालामाल...शिक्रापूर हद्दीत डी पि चोरांचा धुडगूस.. वर्षभरात डी पितील ७७...

प्रशासन हतबल…चोर मालामाल…शिक्रापूर हद्दीत डी पि चोरांचा धुडगूस.. वर्षभरात डी पितील ७७ लाखांचे ११ हजार किलो तांबे गेले चोरीला

ट्रान्सफॉर्मर मधील ७७ लाखांचे तांबे चोरीस आणि १३ लाख २० रुपयांचे ऑईल वाया गेले असून एकूण ९० लाख २० हजारांचे नुकसान

पंधरा दिवसात ३० तर वर्षभरात ११० डी पि गेल्या चोरीला…११० ट्रान्स्फर मधील साधारणतः ७७ लाखांचे ११ हजार किलो तांबे गेले चोरीला तर १३ लाख २० हजार रुपयांचे ऑईल गेले वाया

डिंग्रजवाडी येथील दोन डीपी चोरीला गेल्याने आठशे एकराच्या वर शेतीचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

कोरेगाव भिमा -डिंग्रजवाडी (ता.शिरूर) ग्रामीण भागातील शेतकरी ट्रान्सफॉर्मर चोरीला जात असल्याने मोठ्या प्रमाणात जेरीस आले असून प्रशासन कोमात तर चोर जोमात असून एम एस सी बी उपविभाग शिक्रापूर कार्यालयाच्या व शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत डी पि चोरांनी धुडगूस घातला असून डी पि फोडून त्यातील तांब्याच्या तारा व ऑईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असून या पंधरवाड्यात ३० डी पि चोरीला तर मागील वर्षभरात ११० डी पि चोरीला गेल्या असून एका ट्रान्सफॉर्मर (डी पि.) मध्ये १०० किलो तांबे असते साधारणतः ७७ लाखांचे तांबे चोरीला गेले असून प्रशासन हतबल तर चोर मालामाल होत आहेत.

ट्रान्सफॉर्मर चोरीला जातात म्हणून महावितरण ट्रान्सफॉर्मर का वेल्डिंग केले चोर वेल्डिंग केलेले ट्रान्सफॉर्मर (डी पि) गॅस कटरने कट करून चोरी करण्याचा सपाटा लावला आहे.यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेच आणि महावितरणही जेरीस आले असून सर्वतोपरी प्रयत्न करूनही ट्रान्सफॉर्मर चोरीचे सत्र सुरू आहे. आदल्या दिवशी नट खोलून दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी तांबे चोरीला जात असून हा सर्व प्रकार धूम चित्रपटासारखा चोरीचा प्रकार सुरू आहे की काय ? असा प्रश्न निरांन होत आहे.

महावितरणचे ९० लाख २० हजारांचे नुकसान – महावितरण सध्या मोठ्या पेचात सापडले असून वसुली साठी आधीच मेटाकुटीला आलेल्या महावितरण विभागास चोरांनी सळो की पळो करून सोडले आहे.मागील एका वर्षात नुसत्या शिक्रापूर उपविभागात११० ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले आहेत एका ट्रान्सफॉर्मर मध्ये १५० लिटर ऑईल असते त्याची साधारणतः किंमत ८० रुपये प्रति लिटर ११० ट्रान्सफॉर्मर मधून १३ लाख २० हजारांचे ऑईल तर ७७ लाखांचे तांबे चोरीला गेल्याने ९० लाख २० हजारांचे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांची अवस्था अगोदरच दयनीय झाली असून त्यात शिक्रापूर पोलीस स्टेशन व एम एस सी बी विभागाच्या उपविभागीय शिक्रापूर कार्यालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर डी पि चोरीला जात असून कोरेगाव भिमा ते कारेगाव असे मोठे क्षेत्र असलेल्या विभागात पंधरा दिवसात ३० डी पि तर डिंग्रजवाडी,धानोरे येथे अवघ्या दोन दिवसात पाच डी पि चोरीला गेल्या असून शिक्रापूर हद्दीत वर्षभरात ११० डी पि चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

प्रशासन कोमात..चोर जोमात… डी पि चोरण्यात केले शतक – डी पि मध्ये असणाऱ्या तांब्याच्या तारा व त्याला मिळणारा भाव यामुळे ग्रामीण भागातील शेतातील डी पि चोरण्याचा सपाटा चोरांनी लावला असून यात मात्र त्यांनी शतक पार करत ११० डी पि चोरण्याचा अजब विक्रम रचला असून पोलीस व एम एस सी बी प्रशासन कोमात तर चोर जोमात असून प्रशासन हतबल तर चोर मालामाल आणि शेतकरी वेठीस अशी दुरावस्था झाल्याचे दिसत आहे.

डिंग्रजवाडी येथील स्मशान भूमी शेजारी असणारी डी पि उच्च क्षमतेची आहे तर मंगोबा येथील डी पि अशा दोन्ही डी.पि.वर अनेक शेतकऱ्यांची शेतातील पिके,जनावरे अवलंबून आहे.यामुळे शेती व जनावरांचे हाल होण्याची व पिके जळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून तातडीने डी पि बसवण्याची मागणी शालेय समितीचे अध्यक्ष विकास गव्हाणे व माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे यांच्यासह नागरिकांनी केली. यावेळी खंडू गव्हाणे, दत्तात्रय गव्हाणे, संतोष गव्हाणे अजय गव्हाणे, राजाराम गव्हाणे, विशाल गव्हाणे,संतोष हरिभाऊ गव्हाणे उपस्थित होते.

साहेब…. तेव्हढ चोराला कधी धरताय...एम एस सी बी उपविभाग शिक्रापूर व ग्रामीण भागातील पोलीस स्टेशन हद्दीतील डी पि चोरीला जाण्याचे मोठे प्रमाण असून प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वर्षभरात ११० डी पि चोरीला जाणे हे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेवर व गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात कमी पडतात की काय असे प्रश्न चिन्ह निर्माण करणारे आहे.

सराईत चोर तर चोरीचे तांबे विकत घेणारा सापडेल का ? – एम एस सी बी चे ट्रान्सफॉर्मर चोरणारी चोरांची टोळी सराईत असून गॅस कटर वापरत चोरी करत असून एका दिवसात किमान दोन ते तीन डी पि चोरी होत असल्याचे लक्षात येत असून मोठ्या वजनाचे तांबे वाहतूक करण्यासाठी अचूक रस्त्यांचा व वाहनांचा वापर होत असून अचूक रेकी करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात चोरलेले तांबे चोर कोणास विकत आहेत. एव्हढ्या मोठ्या प्रमाणावरील चोरीचे तांबे नेमके कशासाठी वापरत असतील याचा शोध पोलीस प्रशासन आता तरी घेईल का ???

लहरीनिसर्ग व बिन भरवश्याचा बाजार भाव, खते, बि -बियाणे यांची वाढलेली किंमत ,मशागतीच्या खर्च आणि मिळणारे अशास्वत तुटपुंजे उत्पन्न यामुळे बळीराजा अगोदरच मोडकळीस आला असून वेळेवर डी पि बसली नाही तर पिकाचे नुकसान होण्यासह जनावरांचे हाल होतील..म्हणून शेतकरी साहेबांना … तेव्हढ चोराला कधी धरताय ..अशा विनवणी करताना दिसत आहे तर एम एस सी बी विभागातील अधिकाऱ्यांना साहेब डी पि लवकर बसवा अशी विनंती करत आहेत.

शेतकरी बांधवांनी याबाबत सावध भूमिका घ्यायला हवी.डी पि च्या जवळपास अनोळखी व्यक्ति कोण येते, लाईट गेल्यावर तातडीने लक्ष देणे तसेच जेथे आड बाजूला ट्रान्सफॉर्मर आहे तेथे मोठ्या प्रमाणावर चोऱ्या होत असल्याचे दिसत आहे.पोलीस प्रशासन गस्त घालते यासाठी नागरिक,पोलीस व एक एस सी बी यांच्या एकत्रित काम करण्याची व डी पि ला आधुनिक तंत्रज्ञानाचे वापर करून कसे सुरक्षित करता येईल याबाबत महावितरण विभागाने काम करणे गरजेचे आहे.

शिक्रापूर हद्दीतील शेतकऱ्यांना तातडीने डी पि उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. – उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, शिक्रापूर उपविभाग कार्यालय

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!