Friday, June 21, 2024
Homeताज्या बातम्याशिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी ग्राम पंचायतीचा क्यू आर कोड द्वारे कर वसुलीचा अभिनव...

शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी ग्राम पंचायतीचा क्यू आर कोड द्वारे कर वसुलीचा अभिनव उपक्रम

घरपट्टी बिलावरच क्यू आर कोड छापत ऑनलाईन कर गोळा करणारी पहिली ग्राम पंचायत होण्याचा विक्रम

डिंग्रजवाडी ( ता.शिरूर) या ग्राम पंचायतीने शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील हायटेक ग्राम पंचायत म्हणून नावलौकिक मिळवत आहे.प्रत्येक घरपट्टी बिलावरच छापला क्यू आर कोड छापला असून क्यू आर कोडच्या साहाय्याने ऑनलाईन कर गोळा करणारी शिरूर तालुक्यातील डिंग्रजवाडी पहिली ग्राम पंचायत ठरणार आहे.ग्राम पंचायतींना सध्या घरपट्टी व कर वसुली करण्यासाठी विविध क्लृप्त्या अवलंबाव्या लागतात, वाडा पुनर्वसन ग्राम पंचायतीच्या सरपंच योगिता नितीन ढोरे यांनी ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थाची चालू वर्षाची घरपट्टी भरली या अशा अनेक कलृत्या सरपंच व ग्रामसेवक यांना करावी लागते पण डिंग्रजवाडी ग्राम पंचायतीने आत्तापर्यंत विविध उपक्रम यशस्वी राबवत आपला अनोखा ठसा उमटवला आहे.त्यातच डिंग्रजवाडी येथील सरपंच प्रकाश गव्हाणे ,ग्रामसेवक रमेश जासूद, क्लार्क मोहन भुजबळ यांनी अभिनव उपक्रम राबवत क्यू आर कोड प्रत्येक बिलावर प्रिंट करत कर वसुली वाढवण्याचा हायटेक प्रयत्न केला आहे.

घरपट्टी व इतर कर भरण्यासाठी ग्रामस्थांना ग्राम पंचायतीत जाऊन कर भरणा करावा लागतो पण डिंग्रजवाडी ग्राम पंचायतीने हायटेक प्रणाली राबवण्यासाठी आग्रही असल्याने क्यू आर कोड स्कॅन करून आपली घरपट्टी व इतर कर ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यामुळे आता ग्रामस्थ किंवा कर धारकांना ग्राम पंचायत कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही तसेच घरबसल्या ते आपला कर ऑनलाईन या क्यू आर कोड च्या माध्यमातून भरू शकणार असून त्याची पोच पावती ऑनलाईन मिळणार आहे. यामध्ये त्यांचा ट्रांसॅक्शन आयडी मिळणार आहे यामुळे कर भरलेल्या पावती जपून ठेवण्यापासून ग्रामस्थांची सुटका झाली आहे.

याबाबत ग्राम पंचायत कर पावतीवर क्यू आर छापून ऑनलाईन क्यू आर कोडाच्या साहाय्याने गोळा करणारी शिरूर तालुक्यातील एकमेव ग्राम पंचायत असून शिरूर तालुक्यातील पहिली ग्राम पंचायत ठरण्याचा विक्रम डिंग्रजवाडी ग्राम पंचायतीच्या नावावर झाला आहे.

डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी ३० सप्टेंबर पर्यंत कर भल्यास घरपट्टी करात पाच टक्के सूट देण्यात येणार असून ग्रामस्थांनी ऑनलाईन व कार्यालयात येऊन कर भरण्याचे आवाहन सरपंच प्रकाश गव्हाणे व ग्रामसेवक रमेश जासूद यांनी केले आहे

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!