शिक्रापूर – परिस्थितीवर मात करीत पाबळचा प्रतीक सुनील चौधरी हा सीए ची परीक्षा उत्तीर्ण झाला असून परिसरात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रतीक हा माजी सैनिक सुनीलराव चौधरी यांचा मुलगा. सुनील चौधरी यांनी भारतातील विविध राज्यांमध्ये आपली आर्मीतील सेवा केली. वडिलांसारखाच असामान्य कर्तुत्व मला करावयाचे आहे अशी जिद्द सुरुवातीपासूनच प्रतीकची होती पाबळ सारख्या कायम दुष्काळी भागात जन्मलेल्या प्रतिकने कधीच परिस्थितीचा बाऊ न करता अगदी पाबळच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन पुढील माध्यमिक शिक्षण श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाबळ या ठिकाणी पूर्ण केले.
सुरूवातीपासूनच वाणिज्य शाखेचे आकर्षण असलेल्या प्रतिकला वडिलांनी उच्च शिक्षणासाठी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवले.वाणिज्य शाखेची पदवी घेऊन दूधेडिया आणि कंपनी या नावाजलेल्या चार्टंट अकाउंट फर्म मध्ये प्रॅक्टिस करता करता सी.ए.ची परीक्षा दिली व ती तो यशस्वीपणे उत्तीर्ण झाला.आपल्या यशाबद्दल बोलताना प्रतीक म्हणतो की माझ्या आई-वडिलांचे प्रचंड कष्ट व श्री भैरवनाथ विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचे तसेच मला सतत प्रेरणा देणाऱ्या प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मला माझ्या यशात मोलाचे ठरले आज प्रतीकचा विद्यालयात सन्मान करण्यात आला यावेळी श्री भैरवनाथ सेवक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष कुमार चौधरी, उपप्राचार्य सुदाम पिंगळे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.