Saturday, July 27, 2024
Homeताज्या बातम्यापोलीस भरती झालेल्या अश्विनी जाधव यांचा पंडित दरेकर यांच्याकडून सन्मान

पोलीस भरती झालेल्या अश्विनी जाधव यांचा पंडित दरेकर यांच्याकडून सन्मान

कोरेगाव भीमा – पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील कु. अश्विनी जाधव यांची महाराष्ट्र पोलीस दलाच्या पालघर शहर महिला पोलीस पदी निवड झाल्याबद्दल माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व सुहास दरेकर यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

पिंपळे जगताप सारख्या ग्रामीण भागातील मध्यम वर्गीय कुटुंबातील कुमारी अश्विनी जगताप यांनी मिळवलेले यश हे अत्यंत प्रतिकूल व संघर्षात्मक परिस्थितीतून मिळवल्याने ग्रामीण भागातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पिंपळे जगताप येथील कुमारी अश्विनी जगताप यांची महाराष्ट्र पोलीस दलाच्या पालघर शहर पोलीस महिला पदी निवड झाल्याबद्दल माजी पुणे जिल्हा नियोजन समिती समिती सदस्य पंडित दरेकर यांनी अभिनंदन करत सत्कार केला. यावेळी माजी चेअरमन सुहास दरेकर व पिंपळे जगतापचे ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.

कुमारी अश्विनी जगताप यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील तरुणाईला यामुळे प्रेरणा मिळाली असून यामुळे आगामी काळात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील तरुण तरुणी पोलीस भरतीत यशस्वी होतील.– पंडित दरेकर,माजी सदस्य, पुणे जिल्हा नियोजन समिती

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!