Friday, July 26, 2024
Homeक्राइमपोलीस भरतीच स्वप्न राहिले अधुरे....सरावासाठी जाताना अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू  तर तीन...

पोलीस भरतीच स्वप्न राहिले अधुरे….सरावासाठी जाताना अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू  तर तीन गंभीर जखमी

पोलीस भरतीच्या सरावासाठी निघालेल्या तरुणांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सांगलीच्या रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील  कळंबी या ठिकाणी घडली आहे. पोलीस होण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या या तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. 

     पोलीस भरती होऊन सरकारी नोकरीच्या आशा या अपघाताने मावळल्या आहेत. हाताखाली आलेल्या मुलाला गमवावे लागल्याने कुटुंबाला जाणार धक्का बसला आहे.

          याबाबत मिळालेली माहिती अशी की, सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे येथील तरुण सांगली जिल्हा क्रीडा संकुल कडे निघाले होते.  पोलीस भरतीच्या सरावासाठी दोन दुचाकी वाहनावरून जात असताना चौघां तरुणांना भरधाव वेगाने मागून येणाऱ्या पिकप वाहनाने धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात एक तरुण जागीच ठार तीन जण गंभीर जखमी झालेय.शिरीष अमसिद्ध खंबाळे वय 21 राहणार भोसे असं जागीच ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विश्वजीत विजय मोहिते (वय 24), प्रथमेश उत्तम हराळे (वय 24), दोघे राहणार भोसे , प्रज्वल साळुंखे (वय 24) राहणार कसबे डिग्रज अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून पहाटेच्या सुमारास हे चार तरुण सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबी जवळ आले असता मागून येणाऱ्या भरधाव पिकप वाहनाने जोरदार धडक दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलिस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर प्रज्वल साळुंखे याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते. शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाता मध्ये जागीच ठार झालेल्या आणि जखमी तरुणांना शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी प्रशिक्षकांनी केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!