सणसवाडी येथे पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा संपन्न
कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील पोलीस पाटील मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमात पोलीस पाटील हे अत्यंत जबाबदारीचे व समाजभान बाळगणारे संवेदनशील पद आहे.पोलीस बांधवांना सर्वतोपरी मदत करणारी विश्वसनीय पद असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी केले.
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटीलांचा मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात समान झाला.यावेळी नवनियुक्त पोलीस पाटील यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
उद्योगनगरी सणसवाडी येथील कृष्णलीला मंगला कार्यालयात सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटीलांचा मार्गदर्शन व प्रशिक्षण मेळावा समापांन झाला यावेळी पुणे जिल्ह्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवरांचे उपस्थितीमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला शिरूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
सदर मेळावा ह पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक अंकित गोयल साहेब व महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता व या मेळाव्यास सर्व पोलीस पाटील यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहण्याच्या पत्राद्वारे सर्वांना सूचना देण्यात आली होती.
पोलीस पाटलांना कामकाज करताना येणाऱ्या प्रशासकीय अडीअडचणी व उद्भवणाऱ्या प्रश्नावलींसाठी व इतर शनाका निरसन करण्यासाठी सदर प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.