प्रतिनिधी हेमंत पाटील सातारा
सातारा – कराड दिनांक २० एप्रिलगर्दी मारामारी, दमदाटी, दगडफेक, जाळपोळ करून दहशत माजवणे अशा विविध गुन्ह्यात असलेल्या सातारा शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील एक टोळी, कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्या आणि उंब्रज व पाटण पोलीस ठाण्याचे हद्दीतील एक टोळी अशा चार टोळ्यातील २३ जण पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तडीपार केले आहेत. सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराड शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेली टोळी विशाल उर्फ चिंग्या श्रीकांत घोडके(वय २९, रा.शनिवार पेठ), गणेश संजय वायदंडे(वय २९, रा. बुधवार पेठ कराड), आकाश उर्फ सोन्या निलेश रावखंडे(वय२७, रा.गुरुवार पेठ कराड), शुभम सुनील जाधव(वय २२ रा.गुरुवार पेठ कराड), आदित्य मदन घाडगे(वय २४, रा.शुक्रवार पेठ कराड), बजरंग उर्फ बज्या सुरेश माने(वय २६, रा.बुधवार पेठ कराड), पवन सुनिल भोसले(वय २१), सत्यजित गोरख सूर्यवंशी(वय २३, रा.शिक्षक कॉलनी कराड), योगेश दादा भोसले(वय२०, रा.बुधवार पेठ कराड), प्रतीक विजय साठे(वय २८, रा.बुधवार पेठ कराड), संकेत राजेश डांगे(वय २३ रा.शुक्रवार पेठ कराड) या टोळीला सातारा जिल्हा आणि शिराळा, वाळवा आणि कडेगाव या तालुक्यातून सहा महिने तडीपार करण्यात आले आहे. तर कराड शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असलेले कुंदन जालिंदर कराडकर(वय२३, रा.सैदापुर कराड), अर्जुन यशवंत कुंभार(वय ३० रा.शनिवार पेठ कराड), अभिजित संजय पाटोळे (वय २२, रा.बुधवार पेठ कराड) यांना सातारा जिल्ह्यासह शिराळा, वाळवा, कडेपुर या तालुक्यातून १ वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे हद्दीत विविध गुन्हे दाखल असलेली टोळीतील जयसिंग जनार्दन कांबळे(वय ३४, रा.प्रतापसिंहनगर), अजय देवराम राठोड(वय २९), सुश्रित तानाजी सावंत(वय १८ ), शुभम अजय जाधव(वय २२), ऋतिक उर्फ बाबा अजय जाधव(वय १९), गणेश विलास चव्हाण(वय, सर्व रा.लक्ष्मी टेकडी सदर बाजार) यांना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.उंब्रज आणि पाटण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यातील डुब्या उर्फ नेहाक सुनील पाटील(वय २२), समीर उर्फ वसीम अमीन मणेर(वय ३०), सुहेल सलीम मोमीन (वय ३०, रा. उंब्रज) यांना सातारा जिल्ह्यातून आणि वाळवा, कडेगाव, शिराळा या तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केली.