पुण्यातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
पुणे -पुण्यातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.लोणीकंद पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या वाघोली पोलिस चौकीसमोरच एका तरूणाने स्वतःला पेटवून घेतले होते. त्यामुळे लोणीकंदचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांची देखील उचलबांगडी करण्यात आली असून विशेष शाखेत बदली करण्यात आली.
हडपसर पोलिस ठाण्याच्या अंकित असलेल्या मगरपट्टा पोलिस चौकीत एका महिलेला मारहाण आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप पोलिसांवर करण्यात आला होता. त्याप्रकरणी हडपसरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळकेयांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
प्रमोद बंडू भस्मे (क्राइम पीआय बंडगार्डन ते वरिष्ठ पो. नि. फरसखाना), मनोज एकनाथ शेडगे (कोर्ट आवर ते वरिष्ठ पो. नि. वारजे माळवाडी) पुणे पोलिस , संतोष पांढरे (वाहतूक शाखा ते वरिष्ठ पो. नि. हडपसर), कैलास शंकर करे (क्राइम पीआय हडपसर ते सीनियर पीआय लोणीकंद), शामराव मोढवे (नव्याने हजर ते गुन्हे पीआय भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन), पंडित हणमंत रेजितवाड (नव्याने हजर ते गुन्हे पीआय हडपसर)
युवराज अशोक नांद्रे (नव्याने हजर ते क्राईम पि आय चातूर्शिंगी पोलीस स्टेशन), रवींद्र धर्यशील शेळके (वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन ते आर्थिक गुन्हे शाखा), विश्वजीत वसंत काईंगडे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक लोणीकंद ते विशेष शाखा) असा बदल करण्यात आला आहे.